निखिल राऊत दिसणार रंगभूमीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 15:02 IST2016-12-09T15:02:31+5:302016-12-09T15:02:31+5:30

काहे दिया परदेस या मालिकेतून विकी म्हणजेच निखिल राऊत याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याची विकीची भूमिका आज ...

Nikhil Raut to appear on the theater? | निखिल राऊत दिसणार रंगभूमीवर?

निखिल राऊत दिसणार रंगभूमीवर?

हे दिया परदेस या मालिकेतून विकी म्हणजेच निखिल राऊत याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याची विकीची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता काही मालिकानंतर निखिल हा प्रेक्षकांना लवकरच रंगभूमीवर दिसणार असल्याचे समजत आहे. निखिलने मालिकांप्रमाणेच अनेक चित्रपटदेखील केले आहेत. तसेच त्याचे काही आगामी चित्रपटदेखील येत असल्याचे कळत आहे. निखिल यापूर्वी तू तिथे मी या मालिकेतदेखील दिसला होता. त्याचप्रमाणे तो काहे दिया परदेस, तू तिथ मी या काही मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मात्र प्रेक्षकांनी त्याच्या निगेटिव्ह भूमिकेला ही पसंती दिली असल्याचे पाहायला मिळाले. आता तो एका ऐतिहासिक आगामी चित्रपटात व्यग्र आहे. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटासाठी निखिलने बरीच मेहनत घेतली आहे. तसेच त्याने या चित्रपटासाठी तलवारबाजीचे प्रशिक्षणदेखील घेतले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, मृणाल कुलकर्णी देव, प्रविण तरडे, आस्ताद काळे, अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, नेहा जोशी अशी तगडी कास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्साह आहे. आता तो  मालिका, चित्रपटानंतर रंगभूमीकडे वळण्याच्या विचारात आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट असणार आहे.आता मात्र  तो कोणत्या नाटकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे अदयाप गुलदस्त्यात आहे. त्याचप्रमाणे त्याची या नाटकातील भूमिकेविषयी जाणून घ्यायला ही प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. चला तर काहे दिया परदेसनंतर निखिल पुन्हा रंगभूमीवर प्रेक्षकांना दिसणार असल्याने त्याचे चाहते मात्र नक्कीच आनंदित झाले असणार. 

Web Title: Nikhil Raut to appear on the theater?