Newly Wed:प्रार्थना बेहेरेचे नवीन हनीमून फोटोज् आले समोर, सिडनीमध्ये करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:26 IST2017-12-15T09:56:23+5:302017-12-15T15:26:23+5:30

प्रार्थनाने तिच्या हनीमूनचे हे फोटो इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत.  पती अभिषेक जावकरसोबत प्रार्थना सध्या फुल ऑन हनीमून एन्जॉय करताना ...

Newly Wed: Prayer Behre's New Honeymoon Photos, Front of Sydney, Injury | Newly Wed:प्रार्थना बेहेरेचे नवीन हनीमून फोटोज् आले समोर, सिडनीमध्ये करतेय एन्जॉय

Newly Wed:प्रार्थना बेहेरेचे नवीन हनीमून फोटोज् आले समोर, सिडनीमध्ये करतेय एन्जॉय

रार्थनाने तिच्या हनीमूनचे हे फोटो इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत.  पती अभिषेक जावकरसोबत प्रार्थना सध्या फुल ऑन हनीमून एन्जॉय करताना दिसतेय.जवळपास महिनाभर ती वेगवेगळ्या देशात रम्य स्थळांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेत पती अभिषेकसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करणार आहे.सध्या ती सिडनीमध्ये एन्जॉय करतेय.तेथील समुद्र किना-यावर प्रार्थनाने मनमुराद आनंद लुटला.शेअर केलेल्या फोटोत प्रार्थनाच हॉट अंदाजही पहायला मिळत आहे.निळाशार सागरी किनारा कुणालाही मोहून टाकतो.मग प्रेमात बुडालेले प्रार्थना आणि अभिषेकसुद्धा याला अपवाद कसे ठरतील.प्रार्थनाने नयनरम्य सागरी किना-याचा टिपलेला हा कोलाज.यातील एका फोटोत अभिषेक आनंद लुटताना पाहायला मिळतोय.विशेष म्हणजे जानेवारीपर्यंत परतणार नसल्याचे तिने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. 



कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नुकतीच रेशीमगाठीत अडकली आहे.दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचे शुभमंगल नुकतंच गोव्यात पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला प्रार्थनाचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धमाल केली. त्यांनी सगळ्यांनी प्रार्थनाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. प्रार्थनाचे लग्न गोव्यात झाले होते.


प्रार्थना बेहरेचा लग्नानंतरचा पहिला सिनेमा येणार रसिकांच्या भेटीला.वैभव तत्त्ववादीसह प्रार्थना रोमँटिक अंदाजात झळकणार आहे. ‘What’s Up लग्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे आहे.जाई जोशी आणि नानूजयसिंघानी प्रस्तुतकर्ते असलेला हा सिनेमा ९ फेब्रुवारी २०१८ला प्रदर्शित होणार आहे.सिनेमाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं या हेतूने ३ महिने आधीच हे गाणं प्रदर्शित करण्याचा व त्याच्या प्रसिद्धीतही वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी आवर्जून केला आहे. हनिमून हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं वळण असतं. एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम व्यक्त करणारी गाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Web Title: Newly Wed: Prayer Behre's New Honeymoon Photos, Front of Sydney, Injury