Usha Nadkarni Birthday : अन् तिसऱ्या दिवशी चेक घरी आला...! उषा नाडकर्णींनी असे वसूल केले होते कामाचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 12:22 PM2022-09-13T12:22:09+5:302022-09-13T13:00:30+5:30

Usha Nadkarni Birthday : एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी उषा नाडकर्णी यांची ओळख आहे.  चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. आज आऊंचा वाढदिवस.

marathi actress usha nadkarni birthday know about her personal life | Usha Nadkarni Birthday : अन् तिसऱ्या दिवशी चेक घरी आला...! उषा नाडकर्णींनी असे वसूल केले होते कामाचे पैसे

Usha Nadkarni Birthday : अन् तिसऱ्या दिवशी चेक घरी आला...! उषा नाडकर्णींनी असे वसूल केले होते कामाचे पैसे

googlenewsNext

 Usha Nadkarni Birthday : ‘माहेरची साडी’ हा मराठी चित्रपट आणि ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतील खाष्ट सासू म्हणून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. वयाची सत्तरी कधीच ओलांडलेल्या उषा नाडकर्णी यांनी ‘बिग बॉस मराठी’चा मंच सुद्धा दणाणून सोडला. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे.  चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. आज उषा नाडकर्णी अर्थात आऊंचा वाढदिवस. 13 सप्टेंबर 1946 रोजी जन्मलेल्या आऊंकडे अनेक भन्नाट किस्से आहेत. असाच एक भन्नाट किस्सा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
होय, उषा नाडकर्णी नुकत्याच सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात येऊन गेल्यात. यादरम्यान त्यांनी त्यांच्या स्ट्रगलिंग काळातील एक भन्नाट किस्सा ऐकवला होता.

उषा नाडकर्णी या पूर्णवेळ अभिनेत्री होण्याआधी बँकेत नोकरी करायच्या. अभिनय, नोकरी, घर, नाटक अशी सगळी तारेवरची कसरत करत करत त्या इथवर पोहाचल्या. या प्रवासात त्यांना अनेक मदतीचे हात मिळाले, याऊलट अनेक वाईट माणसंही भेटलीत. असाच एक वाईट अनुभव त्यांनी ‘बस बाई बस’च्या सेटवर शेअर केला होता.

ताई तुम्ही अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. एखाद्या निर्मात्याने तुमचे पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्याच्याकडून ते चांगलेच वसूल केले असतील? असा प्रश्न या कार्यक्रमात उषा यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी हा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, ‘या जगात जितकी चांगली माणसं आहेत, तितकीच लबाड माणसंही आहेत. मी एक मालिका 10 वगैरे एपिसोड करून सोडली. पण त्याचा एक पैसाही मला दिला गेला नाही. मी कित्येक वेळा मॅनेजरला फोन केला. पण फोन केला की वेगळीच माणसं फोन उचलून मॅनेजर नाहीये, असं सांगायचे. हा रोज कसा नसतो, असा प्रश्न मला पडायचा. एक दिवस गंमत झाली, त्या मॅनेजरनेच नेमका माझा फोन उचलला. मी त्याला एकच वाक्य बोलले. माझे पैसे देणार आहेस की नाही. नाहीतर मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन तुझी चड्डी खोलेन आणि पैसे घेऊन जाईल. पुढे काय गंमत, तिसऱ्याच दिवशी माझ्या घरी माझा चेक आला....’

अन् एकदिवस आईनं घरातून हाकलून दिलं
उषाताईंना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सार्वजनिक गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात त्या सहभागी होत असत. मात्र, मात्र त्यांच्या आईचा अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विरोध होता. एकदा तर उषाताईंच्या आईनं रागात त्यांचं सामान घराबाहेर फेकून दिलं होतं.  आईने घरातून हाकलून दिल्यानंतर उषाताई मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या. पण नंतर वडील त्यांना समजावून घरी परत घेऊन आले होते. उषाताईंनी स्वत: हा किस्सा होम मिनिस्टर या कार्यक्रमात सांगितला होता.


 
असं मिळालं आऊ हे नाव
आज उषा यांना ‘आऊ’ या नावानं सगळे ओळखतात. ‘नशिबवान’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान उषा नाडकर्णी यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. तो त्यांना आऊ अशी हाक मारत असे. त्यामुळं संपूर्ण क्रू, सेटवरील सगळी मंडळी उषा नाडकर्णी यांना आऊ.. आऊ अशी हाक मारू लागले. आता त्या याच नावाने जास्त ओळखल्या जातात.
 

Web Title: marathi actress usha nadkarni birthday know about her personal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.