​या मराठी अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 12:19 IST2017-11-22T06:14:43+5:302017-11-22T12:19:09+5:30

होणार सून मी या घरची ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. ...

This Marathi actor made a secret marriage | ​या मराठी अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

​या मराठी अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

णार सून मी या घरची ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेतील जान्हवी, श्री या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच पिंट्या, ताई मावशी या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या. रोहन गुजरने या मालिकेत साकारलेल्या पिंट्या या भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका संपून अनेक महिने झाली असली तरी प्रेक्षक आजही त्याला याच नावाने ओळखतात. तो नुकताच बन मस्का या मालिकेत झळकला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच तो सध्या वर खाली दोन पाय या नाटकात काम करत आहे. त्याच्या या नाटकाची चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत रोहनने छोट्या पडद्यावर त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.
रोहनने नुकतेच त्याची प्रेयसी स्नेहल देशमुख सोबत गुपचूप लग्न केले आहे. त्यानेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना दिली आहे. त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत आम्ही अतिशय साधेपणाने लग्न केले असे लिहिले आहे. त्याचसोबत एका देवळात आई-बाबा, बहिण-भाऊ आणि देवा ब्राम्हणांच्या साक्षीने लग्न केले असे देखील त्याने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. 

Rohan gujar
रोहनने त्याची मैत्रीण स्नेहल देशमुखसोबत जून महिन्यात साखरपुडा केला होता. रोहन आणि स्नेहल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ते एकमेकांचे फ्रेंड्स असल्याचे रोहननेच साखरपुड्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले होते. त्याने त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित साखरपुडा केला होता. रोहनने फेसबुकला त्याच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून त्याच्या साखरपुड्याची बातमी त्याच्या फॅन्सना दिली होती. त्याने साखरपुड्याच्या समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याचसोबत १४ वर्षांची मैत्री... आणि आता डायल टोन... इन्गेंज्ड असे लिहिले होते.
साखरपुडा गुपचूप केल्यानंतर आता रोहनने लग्न देखील गुपचूपच करणे पसंत केले आहे.  

Also Read : ​रोहन गुजरचे इन्स्टाग्राम पेज झाले व्हेरिफाइड

Web Title: This Marathi actor made a secret marriage