​मनिकर्णिकाः द क्वीन ऑफ झासीमध्ये वैभव तत्त्ववादी दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 14:03 IST2017-09-02T08:33:53+5:302017-09-02T14:03:53+5:30

वैभव तत्त्ववादीने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. संजय लीला ...

Manikarnika: The Queen of Jhansi will be seen in the main role of Vaibhav Leader | ​मनिकर्णिकाः द क्वीन ऑफ झासीमध्ये वैभव तत्त्ववादी दिसणार मुख्य भूमिकेत

​मनिकर्णिकाः द क्वीन ऑफ झासीमध्ये वैभव तत्त्ववादी दिसणार मुख्य भूमिकेत

भव तत्त्ववादीने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. संजय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात वैभवने चिमाजीआप्पाजी भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर त्याला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. आता तो आणखी एका ऐतिहासिक चित्रपटामध्ये झळकणार आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येणार असून या चित्रपटात कंगणा राणौत झाशीच्या राणीची भूमिका साकारणार आहे तर या चित्रपटात वैभव पुरण सिंग ही भूमिका साकारणार आहे. पुरण सिंग झाशीच्या राणीच्या सैन्यातील प्रमुख अधिकारी होते. या चित्रपटात वैभवची जोडी अंकिता लोखंडेसोबत जमणार आहे. अंकिता या चित्रपटात झलकरीबाई ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी वैभव सांगतो, मी मनिकर्णिकाः द क्वीन ऑफ झासी या चित्रपटाचा भाग होत असल्याने खूप खूश आहे. या चित्रपटातील माझी भूमिका खूप चांगली असून मी अॅक्शन आणि रोमान्स करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना माझी आणि अंकिताची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. माझ्या फॅन्सना या चित्रपटात मी घोडस्वारी, तलवारबाजी करताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी मी खूप सारी हाणामारीची दृश्यं देखील दिली आहेत. बाजीराव मस्तानी या चित्रपटानंतर मी पुन्हा एकदा एका ऐतिहासिक चित्रपटात काम करत असलो तरी पुरण सिंग ही माझी भूमिका खूप वेगळी आहे. माझ्या फॅन्सना माझी ही भूमिका देखील आवडेल अशी मला खात्री आहे. 

Also Read : ​तेजश्री प्रधान वैभव तत्त्ववादीला म्हणतेय, काहीही हा वी

Web Title: Manikarnika: The Queen of Jhansi will be seen in the main role of Vaibhav Leader