दिग्पाल लांजेकरची हॅट्रिक, आता हे नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 06:30 IST2018-12-17T06:30:00+5:302018-12-17T06:30:05+5:30

दिग्पाल लांजेकरने दिग्दर्शित केलेली चॅलेंज आणि हे मृत्यूंजय ही दोन्ही नाटकं या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस आली  होती. या दोन्ही नाटकांना रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता यानंतर त्याचे तिसरे नाटक रसिकांच्या भेटीस येत असून या नाटकात अजय पूरकर मुख्य भूमिकेत आहेत. 

Digpal Lanjekar Operation Jatayu marathi play will coming soon | दिग्पाल लांजेकरची हॅट्रिक, आता हे नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस

दिग्पाल लांजेकरची हॅट्रिक, आता हे नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस

ठळक मुद्देया नाटकाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ऑपरेशन जटायू असे या नाटकाचे नाव आहे. नाटकाच्या नावावरूनच हे नाटक एका वेगळ्या विषयावर भाष्य करणार याची कल्पना येत आहे.या नाटकाचे लेखन दिग्पाल आणि नितीन वाघ यांनी मिळून केले आहे. या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून पार्श्वसंगीत देवदत्त मनीषा बाजी यांचे आहे. या नाटकातील कलाकारांची वेशभूषा पौर्णिमा ओक यांनी केली आहे. ऑपरेशन जटायू या नाटकाची निर्मिती दिनेश पेडणेकर यांची असून या नाटकात अजय पूरकर यांच्यासोबतच सुनील जाधव, राजू बावडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नाटकाच्या तालमी सध्या जोरदार सुरू असून हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

मराठी रंगभूमीवर सध्या वेगवेगळ्या विषयावरची अनेक नाटकं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या नाटकांना रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता लवकरच एका वेगळ्या विषयावरचे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या नाटकाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

दिग्पाल लांजेकरने दिग्दर्शित केलेली चॅलेंज आणि हे मृत्यूंजय ही दोन्ही नाटकं या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस आली  होती. या दोन्ही नाटकांना रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता यानंतर त्याचे तिसरे नाटक रसिकांच्या भेटीस येत असून या नाटकात अजय पूरकर मुख्य भूमिकेत आहेत. 

सोशल मीडियाद्वारे या नाटकाविषयी नुकतेच सांगण्यात आलेले आहे. या नाटकाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ऑपरेशन जटायू असे या नाटकाचे नाव आहे. नाटकाच्या नावावरूनच हे नाटक एका वेगळ्या विषयावर भाष्य करणार याची कल्पना येत आहे. या नाटकाचे लेखन दिग्पाल आणि नितीन वाघ यांनी मिळून केले आहे. या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून पार्श्वसंगीत देवदत्त मनीषा बाजी यांचे आहे. या नाटकातील कलाकारांची वेशभूषा पौर्णिमा ओक यांनी केली आहे. 

ऑपरेशन जटायू या नाटकाची निर्मिती दिनेश पेडणेकर यांची असून या नाटकात अजय पूरकर यांच्यासोबतच सुनील जाधव, राजू बावडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नाटकाच्या तालमी सध्या जोरदार सुरू असून हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

दिग्पाल हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. 

फर्जंद या चित्रपटाचा दिग्पाल दिग्दर्शक असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. 

 

Web Title: Digpal Lanjekar Operation Jatayu marathi play will coming soon