'धर्मवीर २' सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकून बॉक्स ऑफिस गाजवलं! अवघ्या चार दिवसात कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:44 IST2024-10-01T12:42:53+5:302024-10-01T12:44:29+5:30

'धर्मवीर २' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय (dharmaveer 2)

Dharmaveer 2 box office report day 4 starring prasad oak kshitish date based on cm eknath shinde and anand dighe | 'धर्मवीर २' सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकून बॉक्स ऑफिस गाजवलं! अवघ्या चार दिवसात कमावले इतके कोटी

'धर्मवीर २' सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकून बॉक्स ऑफिस गाजवलं! अवघ्या चार दिवसात कमावले इतके कोटी

'धर्मवीर २' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाची चांगलीच चर्चा होतेय. सिनेमाचे संवाद, गाणी अशा सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. 'धर्मवीर २' सिनेमाची गेले अनेक महिने चांगलीच चर्चा होती. हा सिनेमा रिलीज होताच 'धर्मवीर २' पाहण्यासाठी  प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'धर्मवीर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. 

'धर्मवीर २' ची बॉक्स ऑफिस कमाई

'धर्मवीर २' ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलीय. सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टमध्ये 'धर्मवीर २'ने अवघ्या चार दिवसात ९.२७ कोटींची कमाई केलीय. त्यामुळे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला प्रेक्षक नक्कीच गर्दी करत आहेत असं वातावरण दिसत आहे. 'धर्मवीर २'मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हिंदुत्वासाठी आनंद दिघेंनी कसं मार्गदर्शन दिलं याची अनोखी कहाणी दिसतेय. प्रसाद ओक-क्षितीश दाते यांच्या अभिनयाची जुगलबंदी सर्वांच्या मनावर छाप पाडतेय.


'धर्मवीर २' सिनेमाविषयी

'धर्मवीर २' या सिनेमाची एक विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदेंची भूमिका अभिनेता क्षितीश दातेने उत्कृष्ट  साकारली आहे. सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पहायला मिळत असून पडद्यावर मुख्यमंत्र्यांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमा आनंद दिघेंच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रसाद ओक छाप पाडतोय. एकूणच धर्मवीर नंतर 'धर्मवीर २' सुद्धा चांगलाच गाजतोय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Web Title: Dharmaveer 2 box office report day 4 starring prasad oak kshitish date based on cm eknath shinde and anand dighe