अतुल कुलकर्णीने असे काय केले की त्याला मागावी लागली चाहत्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 12:59 IST2017-12-09T07:29:55+5:302017-12-09T12:59:55+5:30

अतुल कुलकर्णी एक खूप चांगला कलाकार असून त्याने मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हे राम, ...

Atul Kulkarni did what he asked for forgiveness of fans | अतुल कुलकर्णीने असे काय केले की त्याला मागावी लागली चाहत्यांची माफी

अतुल कुलकर्णीने असे काय केले की त्याला मागावी लागली चाहत्यांची माफी

ुल कुलकर्णी एक खूप चांगला कलाकार असून त्याने मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हे राम, चांदनी बार यांसारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी तर अतुलला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित देखील करण्यात आले आहे. त्याने नटरंग, भेट, दहावी फ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तर रंग दे बसंती, पेज थ्री यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अतुल कुलकर्णीचे फॅन फॉलॉव्हिंग हे मोठ्या प्रमाणावर असून त्याचे चाहते सोशल मीडियावर देखील मोठ्या संख्येने त्याला फॉलो करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, अतुलने नुकतीच सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. अतुलने असे काय केले की, त्याला त्याच्या चाहत्यांची माफी मागावी लागली असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अतुलने इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर एक फोटो पोस्ट केला असून हा फोटो पोस्ट करत असतानाच त्याने लोकांची माफी मागितली आहे. 
अतुल कुलकर्णीने त्याच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अतुल वाराणसीतील नदीच्या काठावर उभा असून सिगारेट तोंडात घेऊन ती पेटवताना दिसत आहे. या फोटोसोबत अतुलने पोस्ट देखील लिहिली आहे. त्याने म्हटले आहे की, वाराणसी शूट !! पल्याडचा किनारा... हा सीन मधला फोटो आहे. इंटरेस्टिंग वाटला म्हणून टाकलाय. धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे हे मला १०० टक्के मान्य आहे. मी स्वतः ते करत नाही आणि प्रोत्साहित पण करत नाही. मला माफ करा पण या फोटोवर धुम्रपानाविषयी कमेंट्स आल्या तर त्या डिलीट करण्यात येतील.
अतुलच्या या फोटोवर काही विचित्र कमेंट्स देखील येऊ शकतील असे त्याला वाटत होते. पण असे काहीच झाले नाही. त्याच्या चाहत्यांना अतुल खऱ्या आयुष्यात कसा आहे हे चांगलेच माहीत आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला ओळखतो सर... तुम्ही धुम्रपानाच्या विरोधात आहात हे आम्हाला माहिती आहे अशाप्रकारच्या प्रतिक्रिया फोटोवर आलेल्या दिसतात.

Also Read : तब्बल 11 वर्षांनंतर अतुल कुलकर्णीची 'या' साऊथच्या सुपरस्टारसोबत जमणार जोडी

Web Title: Atul Kulkarni did what he asked for forgiveness of fans