Daagdi Chawl 2 Trailer : चाळ काही.. विसरत नसते! पाहा, ‘दगडी चाळ 2’चा ट्रेलर, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:02 PM2022-08-11T12:02:08+5:302022-08-11T12:03:48+5:30

Daagdi Chawl 2 Trailer : येत्या 19 ऑगस्टला ‘दगडी चाळ 2’ हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. त्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Ankush Chaudhari Makrand Deshpande marathi movie Daagdi Chawl 2 trailer out | Daagdi Chawl 2 Trailer : चाळ काही.. विसरत नसते! पाहा, ‘दगडी चाळ 2’चा ट्रेलर, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त!!

Daagdi Chawl 2 Trailer : चाळ काही.. विसरत नसते! पाहा, ‘दगडी चाळ 2’चा ट्रेलर, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त!!

googlenewsNext

Daagdi Chawl 2 trailer :  मुंबई गँगवॉरमधील सर्वात मोठं नाव म्हणजे ‘अरुण गुलाब गवळी’ उर्फ ‘डॅडी’. त्यांच्या ‘दगडी चाळी’वर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट तुफान गाजला होता. डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केलं तसंच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केलं होतं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chawl 2) हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या 19 ऑगस्टला हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. त्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलर अगदी जबरदस्त आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला ‘दगडी चाळ’मधील काही जुनी दृश्य दिसतात आणि यानंतर डॅडीची एन्ट्री होते. एकेकाळी डॅडीचा उजवा हात असलेला सूर्या आणि डॅडी यांच्यातील टशनची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. सूर्या गँगवॉरच्या जगातून बाहेर पडून साधं सरळ आयुष्य जगतोय. पण अडचणीत आलेल्या डॅडीला नेमक्या अडचणीच्या वेळी सूर्याची आठवण होते. पण सूर्या परतण्यास नकार देतो. डॅडी व सूर्या यांच्यात नेमकं काय बिनसलं आणि सरतेशेवटी या दोघांतील हा कडवटपणा कुठल्या स्तराला जातो, हे मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडणार आहे.

चंद्रकांत कणसे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या वेळी या चित्रपटात गँगवॉरसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी तुमच्या जवळच्या चित्रपगृहात येतोय. या चित्रपटात अंकुश चौधरी ( Ankush Chaudhari ), पूजा सावंत (Pooja Sawant) लीड रोलमध्ये आहेत.

Web Title: Ankush Chaudhari Makrand Deshpande marathi movie Daagdi Chawl 2 trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.