मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 08:35 IST2026-04-27T08:34:54+5:302026-04-27T08:35:16+5:30
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रोहन गुजरला एक मुलगी आणि एक मुलगा झाला आहे.

मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
मराठी कलाविश्वातून एक गुडन्यूज आली आहे. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रोहन गुजरला एक मुलगी आणि एक मुलगा झाला आहे. रोहनने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. जुळ्या मुलांचा फोटा त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या मुलांची झलक पाहायला मिळत आहे. रोहनने त्याच्या मुलांची नावंही या पोस्टमधून सांगितली आहे.
काही महिन्यांपूर्वीच रोहनने बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. रोहनची पत्नी स्नेहल हिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. स्नेहलने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दोन नव्या पाहुण्यांच्या आगमनाने त्यांच्या घरात आनंद साजरा केला जात आहे. हे फोटो शेअर करत रोहनने पोस्टमध्ये म्हटलं आहे की "३ महिने, २ हृदय आणि १ कुटुंब". रोहनने मुलांची नावंही खास ठेवली आहेत. मुलीचं नाव आद्या आणि मुलाचं नाव अद्वय ठेवलं आहे.
रोहनने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत जान्हवीचा भाऊ पिंट्याच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर 'लव्ह लग्न लोचा', 'साथ दे तू मला', 'सांग तू आहेस का', 'बन मस्का', 'नवी जन्मेन मी', 'बारायण' या मालिकांमध्ये तो दिसला. काही वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे. 'मोरया', 'खून करायचाय', 'अलिबाग बायपास' या काही सिनेमांमध्येही तो झळकला.