करण कुंद्रा आणि तेजस्वी यांचा ब्रेकअप? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:44 IST2025-06-12T12:43:00+5:302025-06-12T12:44:07+5:30

करण-तेजस्वीचं नातं संपलं? सोशल मीडियावर ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यात

Karan Kundrra Skips Tejasswi Prakash Birthday Sparks Breakup Rumors | करण कुंद्रा आणि तेजस्वी यांचा ब्रेकअप? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

करण कुंद्रा आणि तेजस्वी यांचा ब्रेकअप? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. करण आणि तेजस्वी हे 'बिग बॉस'च्या १५ व्या सीझनमध्ये एकत्र सहभागी झाले होते, याचठिकाणी त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती.  तेव्हापासून दोघे एकत्र आहेत.  हे कपल कायम एकमेंकावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसून आलं आहे. पण, आता या क्युट कपलमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत.  

तेजस्वी प्रकाश ही उज्जैनमध्ये असून ती एका आगामी प्रोजेक्टसाठी शूटिंग करतेय. उज्जैनमध्येच तिनं तिचा वाढदिवस टीम आणि क्रू मेंबर्ससोबत साजरा केला. तेजस्वीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये करण कुंद्रा न दिसल्याने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे अभिनेता त्याच दिवशी उज्जैनमध्ये होता. इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो समोर आला आहे. तरीही तो तेजस्वीच्या वाढदिवशी तिच्यासोबत दिसला नाही, हे अनेकांच्या लक्षात आलं.

यापूर्वी, तेजस्वी तिच्या वाढदिवसानिमित्त भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात गेली होती. तिथेही ती एकटी दिसली. करण तिच्यासोबत नव्हता.  एएनआयशी बोलताना ती म्हणाली, "मी आज दर्शन आणि भस्म आरतीसाठी महाकालेश्वर मंदिरात गेले होते. आज माझा वाढदिवस देखील आहे. माझा दिवस पहाटे ३ वाजता सुरू झाला". यावेळेसही ती एकटीच होती. हे सगळं पाहता, करण आणि तेजस्वीच्या नात्यात काही बिनसलंय का? असा प्रश्न चाहते करत आहेत. 

तेजस्वी ३२ वर्षांची असून करण ४० वर्षांचा आहे. दोघांमध्ये ८ वर्षांचं वयाचं अंतर आहे. याआधी दोघे अनेक वेळा त्यांच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलले आहेत. मात्र, वाढदिवसासारख्या खास दिवशी करणच्या गैरहजेरीमुळे चाहते खूपच गोंधळले आहेत. सध्या या दोघांकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. गेल्यावर्षीही दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या.

Web Title: Karan Kundrra Skips Tejasswi Prakash Birthday Sparks Breakup Rumors