बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री सेलिना जेटली आता दिसते अशी, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:33 PM2021-10-28T12:33:32+5:302021-10-28T12:34:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

It seems that actress Celina Jaitley, who has disappeared from Bollywood, is now difficult to identify | बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री सेलिना जेटली आता दिसते अशी, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री सेलिना जेटली आता दिसते अशी, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

googlenewsNext

अभिनेत्री सेलिना जेटली बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. सेलिना बऱ्याच मोठ्या कालावधीपासून रुपेरी पडद्यावर झळकताना दिसली नाही. मात्र अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती सोशल मीडियावर नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सेलिना जेटलीने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. जे लोक सेलिनाला फॉलो करत नाहीत, ते तिचा हा फोटो पाहून तिला ओळखू शकले नाहीत.

सेलिना जेटलीने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. हा सेल्फी फोटो आहे. या फोटोत सेलिनाने लाल रंगाची लिपस्टिक आणि कमीत कमी मेकअपमध्ये खूप सुंदर दिसते आहे. या फोटोत ती खूप सुंदर आणि सोज्वळ दिसते आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा फोटो शेअर करत लिहिले की, ऑटममध्ये हा वॉक जेव्हा सर्व पाने फुल बनतात. सेलिनाच्या या पोस्टवर ७ हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत.


सेलिना जेटली सध्या युरोपमध्ये ऑस्ट्रियामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते आहे. सेलिनाने २०११ साली पीटर हागसोबत लग्न केले. लग्नाच्या एक वर्षानंतर ती जुळ्या मुलांची आई बनली होती. त्यानंतर ५ वर्षानंतर सेलिनाने पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यातील एकाचा प्री-मॅच्युअर बर्थ झाल्यामुळे निधन झाले होते.

Web Title: It seems that actress Celina Jaitley, who has disappeared from Bollywood, is now difficult to identify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.