'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:39 IST2026-05-09T17:38:45+5:302026-05-09T17:39:14+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री रूपा गांगुली यांनी या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारली होती. त्या आज बंगालमधील भाजपच्या एक मोठ्या नेत्या आहेत.

In Mahabharata serial Roopa Ganguly wore a 250-meter long saree, which was made by this company How much did it cost | 'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 

'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 


बी.आर. चोप्रा यांनी १९८८ मध्ये साकारलेली 'महाभारत' नावाची मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेतील सर्वात स्मरणीय दृश्यांपैकी एक म्हणजे, 'द्रौपदी वस्त्रहरण'. या ऐतिहासिक मालिकेतील 'द्रोपदी वस्त्रहरणा'चे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांनी एकाच कापडापासून तयार केलेली, तब्बल २५० मीटर लांबीची, पिवळ्या रंगाची सिल्कची साडी तयार करून घेतली होती. प्रसिद्ध अभिनेत्री रूपा गांगुली यांनी या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारली होती. त्या आज बंगालमधील भाजपच्या एक मोठ्या नेत्या आहेत.

खरे तर, या दृष्ट्याच्या चित्रीकरणादरम्यान रूपा गांगुली यांनी ६ मीटरचीच सामान्य साडी नेसली होती, मात्र भगवान श्रीकृष्णांनी साडी वाढवल्याचा चमत्कार दाखवण्यासाठी या २५० मीटर लांब साडीचा वापर करण्यात आला होता. यासंदर्भात मालिकेचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्या माहितीनुसार, ही साडी त्या काळातील प्रसिद्ध कापड कंपनी 'बिन्नी अँड कंपनी' (Binny & Co.) कडून तयार करून घेण्यात आली होती. 

१९८८ च्या काळात एका चांगल्या क्रेप सिल्क साडीची किंमत ४५० ते ७५० रुपयांच्या दरम्यान होती. यानुसार, ही २५० मीटरची विशेष साडी तयार करण्यासाठी अंदाजे ३४ हजार रुपये एवढा खर्च आला होता. ही त्यावेळी फार मोठी रक्कम मानली जात होता.

या कंपनीची स्थापना जॉन बिन्नी यांनी १७९९ मध्ये मद्रास येथे (आताचे चेन्नई) केली होती. भारतातील सर्वात जुन्या कापड गिरण्यांपैकी ही एक होती. विशेष म्हणजे, १९७० आणि ८० च्या दशकात बिन्नीची 'क्रेप सिल्क' साडी लग्नसमारंभांसाठी पहिली पसंत असायची. विशेष म्हणजे, या कंपनीचे कापड एवढे मजबूत होते की, 'बिन्नीचे कापड कधीच फाटत नाही' असे गमतीने म्हटले जाई.

 

Web Title : 'महाभारत' में 250 मीटर की साड़ी: कीमत और कंपनी जिसने इसे बनाया।

Web Summary : रूपा गांगुली ने 'महाभारत' में 'द्रौपदी वस्त्रहरण' के लिए 250 मीटर की साड़ी पहनी थी। बिन्नी एंड कंपनी ने इसे बनाया था, जिसकी कीमत तब ₹34,000 थी। अभिनेत्री ने एक सामान्य साड़ी पहनी थी और 250 मीटर की साड़ी का उपयोग साड़ी को बढ़ाने का भ्रम पैदा करने के लिए किया गया था।

Web Title : 250-meter saree in 'Mahabharat': Cost and the company behind it.

Web Summary : Roopa Ganguly wore a 250-meter saree for 'Draupadi Vastraharan' in Mahabharat. Binny & Co. made it, costing ₹34,000 then. The actress wore a normal saree and the 250 meter saree was used to create the illusion of the saree increasing.