मायकल जॅक्सनच्या निधनानंतर एकटा पडला त्याचा 'बबल्स'; सध्या कुठे आहे गायकाचा लाडका मित्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:18 IST2026-04-29T10:16:22+5:302026-04-29T10:18:56+5:30
Michael jackson: मायकल गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून ते फोटोशूटपर्यंत प्रत्येक इव्हेंटमध्ये बबल्सला सोबत घेऊन जायचा.

मायकल जॅक्सनच्या निधनानंतर एकटा पडला त्याचा 'बबल्स'; सध्या कुठे आहे गायकाचा लाडका मित्र?
किंग ऑफ पॉप म्हणून ओळखला जाणारा हॉलिवूड गायक मायकल जॅक्सन (Michael Jackson) याचं निधन होऊन बराच काळ उलटला. मात्र, त्याच्याविषयी आजही अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगतात. मायकल जॅक्सनचं निधन ही गोष्ट जितकी रंगली तितकीच चर्चा सध्या त्याच्या लाडक्या बबल्सची होतीये. मायकलाच अत्यंत खास, जवळचा म्हणून तो ओळखला जायचा. मायकल कुठेही गेला तरी बबल्सला त्याच्यासोबत घेऊन जायचा. परंतु, मायकलच्या निधनानंतर त्याचा हा मित्र कुठे गेला माहितीये का?
बबल्स म्हणजे मायकलचा लाडका पाळीव चिंपांजी. मायकल गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून ते फोटोशूटपर्यंत प्रत्येक इव्हेंटमध्ये बबल्सला सोबत घेऊन जायचा. मात्र, मायकलचं निधन झालं आणि बबल्स एकटा पडला. त्यामुळेच सध्या तो काय करतो, कुठे राहतो असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.
सध्या कुठे आहे बबल्स?
१९८० मध्ये मायकलने बबल्सला टेक्सासमधील एका रिसर्च सर्व्हिसमधून दत्तक घेतलं होतं. तेव्हापासून तो मायकलसोबतच होता. मात्र, मायकलच्या निधनानंतर २००५ मध्ये त्याला फ्लोरिडामधील सेंटर ऑफ ग्रेट एप्स यांच्या हवाली केलं. हे सेंटर मायकल जॅक्सन एस्टेट प्रमोट करतं. त्यामुळे बबल्सच्या देखभालीचा खर्चदेखील त्यांच्याकडूनच केला जातो.
दरम्यान, बबल्स आता ४३ वर्षांचा झाला असून त्याला पेंटिंग करायला विशेष आवडतं. बबल्सच्या केअर टेकरच्या म्हणण्यानुसार, बबल्सला चित्र काढायला प्रचंड आवडतं. आणि, जोपर्यंत त्याचं चित्री काढून पूर्ण होत नाही तोपर्यंत तो एका जागेवरुन उठत नाही. बबल्स सध्या धकाधकीच्या जीवनापासून दूर शांततेमध्ये आयुष्य व्यतीत करत आहे. अलिकडेच मायकल जॅक्सनची बहीण तोया जॅक्सन बबल्सला भेटायला गेली होती.