केटीला ‘आई’ भूमिकेस द्यायचेय प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 20:07 IST2016-12-03T19:57:41+5:302016-12-03T20:07:42+5:30

अभिनेत्री केटी होम्स सध्या आई होण्याचे सुख अनुभवत असून, आईच्या जबाबदाºया पार पाडण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. जेव्हा ती ...

Prefer to give Katie the role of 'I' | केटीला ‘आई’ भूमिकेस द्यायचेय प्राधान्य

केटीला ‘आई’ भूमिकेस द्यायचेय प्राधान्य

िनेत्री केटी होम्स सध्या आई होण्याचे सुख अनुभवत असून, आईच्या जबाबदाºया पार पाडण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. जेव्हा ती कामात नसते तेव्हा ती मुलगी सुरी हिला वेळ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करते. 

ईआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा केटी सेटवर असते, तेव्हा काम उरकून घरी जाण्यासाठी तिची धडपड सुरू असते. वेळेत घरी जाता यावे हा एकमेव ध्यास तिला लागलेला असतो. काम उरकल्यानंतर लगेचच ती घराकडे धाव घेते. मुलीला अधिकाधिक वेळ देता यावा हा एकमेव उद्देश यामागचा असल्याचे ती सांगते. 

पहिला पती टॉम क्रुज याच्यापासून तिला सुरी नावाची मुलगी आहे. मॉडर्न लक्झरी होम्स या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा केटी सेटवर नसते तेव्हा ती अभिनेत्री नसून आईच्या भूमिकेत असते. याविषयी केटी सांगते की, जेव्हा मी एखाद्या समारंभात जात असते, तेव्हा रात्री १० वाजेच्या आत घरी येणे हा एकमेव विचार माझ्या मनात घोंगावत असतो. 

मुलीच्या पालनपोषणात मला कुठल्याच प्रकारची उणिव ठेवायची नाही. मी जरी सेलिब्रिटी असली तरी माझे पहिले ध्येय मुलीचा सांभाळ आहे. माझ्या अनुसार ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवे, यामध्ये मुलीचे स्थान सर्वोच्च आहे.



अभिनेत्री केटी होम्स मुलगी सुरीसोबत...

Web Title: Prefer to give Katie the role of 'I'