किमने कान्येला बजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 20:11 IST2016-12-01T20:11:32+5:302016-12-01T20:11:32+5:30

एका लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान रॅपर कान्ये याला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. सध्या तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. ...

Kimne told Kanye | किमने कान्येला बजावले

किमने कान्येला बजावले

ा लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान रॅपर कान्ये याला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. सध्या तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मात्र याठिकाणीदेखील तो म्युझिकपासून दूर राहणे पसंत करीत नाही. तो त्याच्या काही इन्स्ट्रुमेंटची याठिकाणी सतत मागणी करीत आहे, परंतु पत्नी किम करदाशियांने यास सक्त विरोध केला असून, फक्त आराम करायचा असे त्याला बजावून सांगितले आहे.
 
‘यूएस वीकली’ने दिलेल्या माहितीनुसार ३९ वर्षीय रॅपर कान्ये वेस्ट याने किमला काही म्युझिक इंन्स्ट्रुमेंट दिले जावेत, अशी मागणी केली होती. परंतु किमने यास स्पष्ट शब्दात नकार देत आराम करण्याचे बजावून सांगितले आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कान्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याच्या आगामी अल्बमवर काम करू इच्छितो. 

त्यामुळे तो हॉस्पिटल प्रशासनाकडे सातत्याने रेकॉर्डिंगसाठी लागणाºया साहित्याची मागणी करीत आहे. वास्तविक त्याला बेडवरून उतरता येत नाही. अशात तो रेकॉर्डिंगचे काम कसे करणार या भीतीने हॉस्पिटल प्रशासनाने त्याच्या या मागणीस स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. 

त्यातच किम स्वत: दिवसभर कान्येसोबत हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहत असल्याने त्याला आराम करण्याखेरीज दुसरा पर्याय उपलब्ध नाही. एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर किमला त्रास होऊ लागल्याचे आयोजकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला कुठल्या कारणाने त्रास होत होता, याचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केले गेले नाही. फक्त तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे हीच माहिती आतापर्यंत समोर आली आहे. कान्येला अचानकपणे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याने किम चिंतित आहे. 



पत्नी किम करदाशियांसोबत कान्ये वेस्ट

Web Title: Kimne told Kanye