जेंसेन बनला जुळ्या मुलांचा बाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 22:26 IST2016-12-06T22:26:34+5:302016-12-06T22:26:34+5:30

हॉलिवूड स्टार जोडी जेंसेन एकल्स आणि डॅनील एकल्स यांच्या घरी जुळ्या पाहुण्यांची एंट्री झाली आहे. दोघांनीही या नव्या पाहुण्यांचे ...

Jensen became father of twins | जेंसेन बनला जुळ्या मुलांचा बाप

जेंसेन बनला जुळ्या मुलांचा बाप

लिवूड स्टार जोडी जेंसेन एकल्स आणि डॅनील एकल्स यांच्या घरी जुळ्या पाहुण्यांची एंट्री झाली आहे. दोघांनीही या नव्या पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत केले असून, त्यांचे नामकरण केले आहे. 

जेप्पेलीन ब्राम आणि एरो रोड्स अशी त्यांची नावे ठेवली असून, दोन्ही मुले खूपच क्युट आहेत. पीपुल्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार गेल्या शुक्रवारी डॅनील एकल्स हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. 
याची बातमी खुद्द जेंसेननेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली. त्याने लिहिले की, डॅनील, जेजे आणि मी जेप्पेलीन ब्राम आणि एरो रोड्स यांच्या जन्मामुळे खूपच उत्साहित आहोत. आमच्यात खूप चांगले ट्विनिंग असून, आम्ही दोघेही मुलांच्या जन्मामुळे खूश आहोत. 

जेंसेन आणि डॅनील तीन वर्षाची मुलगी जय ऊर्फ जेजे नावाची मुलगी असून, हे कपल सध्या सुखी संसाराचे जीवन जगत आहे.



जेंसेन एकल्स, डॅनील एकल्स आणि त्यांची मोठी मुलगी जेजे 

Web Title: Jensen became father of twins