जेनिफरच्या जंपसूटची किंमत ३५५४ पौंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 21:00 IST2016-12-08T20:52:46+5:302016-12-08T21:00:41+5:30

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. कधी हेअर स्टाइल, तर कधी आपल्या आगळ्या-वेगळ्या पेहरावामुळे ती चर्चेत असते. ...

Jennifer Jumpsuit costs 3554 pounds | जेनिफरच्या जंपसूटची किंमत ३५५४ पौंड

जेनिफरच्या जंपसूटची किंमत ३५५४ पौंड

लिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. कधी हेअर स्टाइल, तर कधी आपल्या आगळ्या-वेगळ्या पेहरावामुळे ती चर्चेत असते. तिच्या आगामी ‘आॅफिस क्रिसमस पार्टी’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी असाच एक हटके पेहराव करून उपस्थितांकडून तिने वाहवा मिळविली. 

या पेहरावाचे वैशिष्ट्ये म्हणजे तब्बल ३५५४ पौंड एवढ्या किमतीचा जंपसूट परिधान करून तिने लावलेली हजेरी अनेकांची बोलती बंद करणारी होती. ‘हॅलोमॅगजीन डॉट कॉम’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार डिजाइनर ब्रॅडन मॅक्सवेल याने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा जंपसूट तिच्या अंगावर खूपच आकर्षक दिसत होता. वन साइड शोल्डरवाल्या या जंपसूटमुळे जेनिफरचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत होते. यावेळी तिच्या हातात काळ्या रंगाची पर्सही होती. 

न्यूयॉर्क येथील लॅण्डमार्क सनशाइन थिएटर्स येथे या प्रीमियर शोचे आयोजन केले होते. सोनेरी रंगाचे केस, आकर्षक जंपसूटमुळे जेनिफरचा लुक खूपच स्टायलिश दिसत होता. त्यामुळे ती उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली. आपला लुक आणखी आकर्षक दिसावा म्हणून तिने अतिशय पातळ असे कानातल्या रिंग परिधान केल्या होत्या. तसेच चांदीचे ब्रेसलेटही घातले होते. शोल्डर उघडे दिसू नयेत, म्हणून तिने काळ्या रंगाचा एक कोट परिधान केला होता. जेनिफरच्या या स्टायलिश अंदाजावर सगळे फिदा झाले होते. 


Web Title: Jennifer Jumpsuit costs 3554 pounds