जेसिका केसांना लावतेय नारळाचे तेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 22:27 IST2016-12-06T22:19:55+5:302016-12-06T22:27:07+5:30

हॉलिवूड अभिनेत्री जेसिका अल्बा रात्री न विसरता केसांना जॅतून किंवा नारळाचे तेल लावत असते.  फिमेलफर्स्ट डॉट कॉम या वेबसाइटने ...

Coconut oil is on Jessica's hair | जेसिका केसांना लावतेय नारळाचे तेल

जेसिका केसांना लावतेय नारळाचे तेल

लिवूड अभिनेत्री जेसिका अल्बा रात्री न विसरता केसांना जॅतून किंवा नारळाचे तेल लावत असते. 

फिमेलफर्स्ट डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षीय जेसिकाला दोन मुली आहेत. आॅनर (८) आणि हॅवन (५) असे त्यांची नावे आहेत. जेसिकाला लहानपणापासूनच तिच्या आईने डोक्याचे केस आणि त्वचेची निगा कशी राखावी याचे धडे दिले आहेत. त्यामुळे तिचे कितीही बिझी शेड्यूल्ड असले तरी न विसरता ती या कामासाठी वेळ काढत असते. 

‘लुक’ साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत जेसिकाने सांगितले की, माझ्या आईने नेहमीच मला स्किन आणि केसांची देखभाल कशी घ्यावी, हे शिकविले आहे. मी लहानपणापासूनच हे करीत आले आहे. 

तुझ्या मुलींनाही याची शिकवण देणार का? असे जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा मात्र तिने मुलींना आत्मविश्वासी आणि लोकांसोबत चांगली वर्तवणूक करण्याची शिकवण देणार असल्याचे म्हटले. सुंदरतेचा सल्ला देताना जेसिकाने सांगितले की, प्रत्येक व्यक्ती मनाने सुंदर असायला हवी. परंतु दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. 



जेसिका अल्बा आणि तिच्या मुली आॅनर आणि हॅवन

Web Title: Coconut oil is on Jessica's hair