जेसिकाचा अभिनयातून ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 20:01 IST2016-12-03T20:01:16+5:302016-12-03T20:01:16+5:30

हॉलिवूड अभिनेत्री जेसिका चेस्टनने तिच्या फॅन्सला जबरदस्त झटका दिला आहे. कारण ते येणारे काही वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचे ...

Break from Jessica's performance | जेसिकाचा अभिनयातून ब्रेक

जेसिकाचा अभिनयातून ब्रेक

लिवूड अभिनेत्री जेसिका चेस्टनने तिच्या फॅन्सला जबरदस्त झटका दिला आहे. कारण ते येणारे काही वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचे खुद्द तिनेच जाहीर केले आहे. कारण तिला कॅमेºयामागची भूमिका साकारायची आहे.  

फिमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ३९ वर्षीय जेसिकाला वाटते की, आता करिअरमध्ये बदल करायला हवा. अभिनयापेक्षा नवोदित कलाकारांना अभिनयाचे धडे देणे आणि प्रॉडक्शन अंतर्गत चित्रपटांचे दिग्दर्शन करणे यासाठी ती सक्षम आहे. 

नेट-ए-पोर्टरच्या ‘द एडिट’ या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार जेसिकाने तिच्या भविष्यातील करिअरबाबत सांगितले की, मी आता अभिनय करू शकणार नाही. मला असे वाटते की, आता दिग्दर्शन क्षेत्रात नशिब आजमवयाला हवे किंवा जुलियार्ड येथे नवोदित कलाकारांना अभिनयाचे धडे द्यायला हवेत.  हा बदल लवकरच तिच्या आयुष्यात होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Break from Jessica's performance