'मणिकर्णिका'सिनेमासाठी बॉलिवूडच्या क्वीन कंगणाला या अभिनेत्याने दिलं प्रशिक्षण,कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:03 IST2017-12-08T05:33:20+5:302017-12-08T11:03:20+5:30

जीतू वर्मा हा बॉलिवुडचा अभिनेता.त्याने 'सोल्जर', 'बॉडीगार्ड', 'सन ऑफ सरदार', 'बोल बच्चन' अशा विविध सिनेमात जीतू वर्मा याने छोट्या ...

Who is the trainer of Bollywood actor Queen Kangna for 'Manikarnika'? | 'मणिकर्णिका'सिनेमासाठी बॉलिवूडच्या क्वीन कंगणाला या अभिनेत्याने दिलं प्रशिक्षण,कोण आहे तो?

'मणिकर्णिका'सिनेमासाठी बॉलिवूडच्या क्वीन कंगणाला या अभिनेत्याने दिलं प्रशिक्षण,कोण आहे तो?

तू वर्मा हा बॉलिवुडचा अभिनेता.त्याने 'सोल्जर', 'बॉडीगार्ड', 'सन ऑफ सरदार', 'बोल बच्चन' अशा विविध सिनेमात जीतू वर्मा याने छोट्या मात्र तितक्याच महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.यापैकी त्याने साकारलेल्या बहुतांशी भूमिका या खलनायकाच्या होत्या किंवा मग त्या सहकलाकार रुपातील होत्या. एक अभिनेत्यासह जीतू वर्माची आणखी एक ओळख म्हणजे घोडेस्वार. जीतू वर्माकडे डझनभर घोडेसुद्धा आहेत. अभिनयासह घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्याचे कामही तो करतो. विविध सिनेमातील दिग्गज कलाकारांना त्याने घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले आहे.‘बाहुबली2 साठी त्याने तमन्ना भाटीयाला घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले होते.सध्या बॉलिवूडमध्ये बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौतची प्रमुख भूमिका असलेल्या मणिकर्णिका या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाच्या निमित्ताने झाशीच्या राणीची शौर्यगाथा रसिकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात कंगणा झाशीच्या राणी लढाई करत शत्रूशी दोन हात करताना पाहायला मिळेल. या सिनेमात कंगणा घोडेस्वारी करतानाही दिसणार आहे.यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे.कंगणाला घोडेस्वारीचे हे प्रशिक्षण दुस-या तिस-या कुण्या व्यक्तीने नाही तर खुद्द जीतू वर्माने दिले आहे.जीतू वर्माकडून घेतलेल्या प्रशिक्षणानंतर कंगणाचा सिनेमातील अंदाज कसा असेल याची उत्सुकता आणखी वाढली आहे.याआधी जीतू वर्माने अन्य सिनेमांच्या कलाकारांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले आहे. मणिकर्णिका सिनेमाच्या निमित्ताने कंगणासोबत काम करण्याची जीतू वर्माची ही दुसरी वेळ आहे. याआधी रंगून सिनेमासाठी जीतू वर्माने कंगणाला घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिलं होतं. याशिवाय राबता सिनेमात सुशांत सिंह राजपूत आणि कृती सॅनॉन हिलाही जीतू वर्माने घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले आहे. 

Also Read:डोळ्यावर आघात होऊनही खचला नाही 'सोल्जर' फेम अभिनेता जीतू वर्मा, करतो आहे जनजागृती!

Web Title: Who is the trainer of Bollywood actor Queen Kangna for 'Manikarnika'?