धरमपाजींकडून झाली होती गलती से मिस्टेक, तरीही फॅन्सनी ट्रोल न करता म्हटलं होतं Love u Sir !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:50 IST2020-04-23T18:46:06+5:302020-04-23T18:50:03+5:30

चुकून पोस्ट झालेल्या फोटोलाही रसिकांकडून प्रेम आणि दाद मिळाली.

when Dharmendra wrongly post his photo, but fans didnt troll him-SRJ | धरमपाजींकडून झाली होती गलती से मिस्टेक, तरीही फॅन्सनी ट्रोल न करता म्हटलं होतं Love u Sir !

धरमपाजींकडून झाली होती गलती से मिस्टेक, तरीही फॅन्सनी ट्रोल न करता म्हटलं होतं Love u Sir !

उत्साह आणि आनंदाच्या भरात अनेकदा आपण जे नाही करायचं ते करतो. आपण स्वतःच्या आनंदात इतके मग्न असतो की आपण काय करतो आहे किंवा काय केले आहे याचे भानही आपल्याला नसतं. असंच काहीसं घडलं बॉलीवुडचे हिमॅन आणि ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्यासोबत. धर्मेंद्र यांचा लेक बॉबी देओल बहुप्रतिक्षित 'रेस-३' या सिनेमात सलमान खानसह झळकणार होता. सिनेमाचा ट्रेलर पाहून आणि लेकाच्या कमबॅकमुळे धरमपाजी भलतेच एक्साईट झाले. त्यांच्या आनंदाला जणू काही पारावारच उरला नाही. आपला हाच आनंद त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांसह शेअर करायचं असं ठरवलं. त्यांनी इन्स्टाग्रामवर सिनेमाच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देताना धरमपाजींनी रेस-३च्या पोस्टरऐवजी स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. 

हीच कृती दुसऱ्या कलाकाराने केली असती तर सोशल मीडियावर त्या कलाकाराला रसिकांनी एव्हाना ट्रोल केले असते. मात्र धरमपाजींची बातच काही और होती. आजही रसिकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा कायम आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चुकून पोस्ट झालेल्या फोटोलाही रसिकांकडून प्रेम आणि दाद मिळाली. रसिकांनी त्यांची तोंडभरुन स्तुती केली. त्यांना हँडसम, उत्तम बॉडी अशी विशेषणं देत फॅन्सनी धरमपाजींवरील आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. 
 

Web Title: when Dharmendra wrongly post his photo, but fans didnt troll him-SRJ