'टी सीरिज' कंपनी आज बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध, पण 'टी'चा नेमका अर्थ काय? ९९% लोकांना माहितच नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:44 IST2026-05-14T13:43:11+5:302026-05-14T13:44:51+5:30
भक्ती गीतांपासून ते ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या संगीतापासून ते चित्रपटाच्या निर्मितीपर्यंत टी-सीरीजने गेली अनेक वर्ष कोट्यवधी लोकांवर राज्य केलं. अनेकांना या कंपनीतील 'टी' (T) या अक्षराचा अर्थ काय, याबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घ्या त्याबद्दल

'टी सीरिज' कंपनी आज बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध, पण 'टी'चा नेमका अर्थ काय? ९९% लोकांना माहितच नसेल
टी-सीरीज ही आज केवळ एक म्युझिक कंपनी नसून भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वात यशस्वी प्रॉडक्शन कंपनीपैकी एक आहे. भक्ती गीतांपासून ते ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या संगीतापासून ते चित्रपटाच्या निर्मितीपर्यंत टी-सीरीजने गेली अनेक वर्ष कोट्यवधी लोकांवर राज्य केलं. अनेकांना या कंपनीतील 'टी' (T) या अक्षराचा अर्थ काय, याबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घ्या त्याबद्दल
'टी-सीरीज' मधील 'टी' चा अर्थ
अनेक जण टी-सीरीज हे नाव सहज उच्चारतात. पण त्यातील 'टी' हा शब्द असाच असेल असं त्यांना वाटतं. पण त्यामागे रंजक कहाणी आहे. 'टी सीरिज'चे संस्थापक गुलशन कुमार हे भगवान शंकराचे मोठे भक्त होते. त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचा पाया रचताना कंपनीचे नावही भगवान शिवाच्या नावावरून ठेवले. कंपनीचे मूळ नाव 'त्रिशूल कॅसेट्स इंडस्ट्रीज' (Trishul Cassettes Industries) असे होते. म्हणजेच 'टी' चा अर्थ 'त्रिशूल' असा आहे. हेच नाव पुढे छोटं होऊन 'टी-सीरीज' या नावाने जगभर प्रसिद्ध झाले.
गुलशन कुमार यांचा धक्कादायक अंत
१९९७ मध्ये जेव्हा मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीवर अंडरवर्ल्डचे सावट होते, तेव्हा गुलशन कुमार यांनी अंडरवर्ल्डला खंडणी देण्यास नकार दिला होता. यामुळे दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली, ज्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. गुलशन कुमार यांच्यानंतर त्यांचे पुत्र भूषण कुमार यांनी कंपनीची धुरा सांभाळली आणि टी-सीरीजला केवळ म्युझिक कंपनीपुरते मर्यादित न ठेवता चित्रपट निर्मिती आणि डिजिटल कंटेंटमध्ये नवीन उंचीवर नेऊन ठेवले. आज टी-सीरीज ही देशातील सर्वात मोठी म्युझिक आणि एंटरटेनमेंट कंपनी आहे.