Video: नॉनव्हेज खाणं आलं मलायकाच्या अंगाशी; खोटारडी आहे म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:37 AM2024-02-26T11:37:52+5:302024-02-26T11:48:19+5:30

Malaika arora: मलायकाचा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

viral-social-farah-khan-shared-malaika-arora-video-actress-trolled-unabashedly-heated-fans-by-pretending-to-be-a-vegetarian | Video: नॉनव्हेज खाणं आलं मलायकाच्या अंगाशी; खोटारडी आहे म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Video: नॉनव्हेज खाणं आलं मलायकाच्या अंगाशी; खोटारडी आहे म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असेही आहेत ज्यांनी मांसाहारी पदार्थांना रामराम करत शाकाहारी होणं पसंत केलं आहे. यात व्हेजिटेरिअन असलेल्या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री मलायका अरोरा हिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मात्र, सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. यात ती चक्क नॉनव्हेज खाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ झलक दिखला जा 11 च्या सेटवरचा आहे.  यात मलायका लंचब्रेकमध्ये जेवणासाठी कोणकोणते पदार्थ आहेत हे दाखवत आहे. विशेष म्हणजे मलायका स्वत:ला व्हेजिटेरियन असल्याचं सांगते आणि नॉनव्हेज खाते हे पाहून नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली आहे.

अलिकडेच मलायकाने व्हिगन डाएट' (Vegan Diet) करत असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाही तर ती PETA ची सदस्य असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे स्वत:ला व्हिगन वगैरे म्हणणारी मलायका अचानकपणे नॉनव्हेज कसं काय खाऊ लागली? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर मलायकाने खोटं बोलत चाहत्यांची फसवणूक केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले नेटकरी?

'हिने तर एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ती व्हेजिटेरियन आहे. मग आता काय झालं?', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहेत. तर, 'ही खोटारडी आहे नॉनव्हेज खाते आणि व्हेजिटेरियन असल्याचं सांगते', 'जर ती व्हिगन आहे तर तिच्या जेवणाच्या टेबलावर फिश करी काय करते?', 'मला वाटतंय मलायका व्हेजिटेरियन आहे', अशा असंख्य कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, मलायकाचा हा व्हिडीओ प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सगळे जण पार्टी करत आहेत. यात फराह, मलायका, अर्शद वारसी, गुरु रंधावा हे सेलिब्रिटी दिसून येत आहेत.

Web Title: viral-social-farah-khan-shared-malaika-arora-video-actress-trolled-unabashedly-heated-fans-by-pretending-to-be-a-vegetarian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.