सिनेमानंतर डिनो मोरिया करतोय 'ही' नवी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 21:00 IST2019-01-29T21:00:00+5:302019-01-29T21:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेता- मॉडेल डिनो मोरिया लवकरच वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तसेच तो सिनेमाच्या कथेवरही सध्या काम करतोय.

Very soon dino moria will seen in web series | सिनेमानंतर डिनो मोरिया करतोय 'ही' नवी गोष्ट

सिनेमानंतर डिनो मोरिया करतोय 'ही' नवी गोष्ट

ठळक मुद्देडिनोला वेब सिरीजसाठी अनेक ऑफर्स आल्याची माहिती आहे.

बॉलिवूड अभिनेता- मॉडेल डिनो मोरिया लवकरच वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तसेच तो सिनेमाच्या कथेवरही सध्या काम करतोय. वेबविश्वातील ऑफर्स आणि त्यातील भूमिका या अधिक निरनिराळ्या असून जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठीचे हे उत्तम व्यासपीठ आहे' असे डिनो सांगतो. डिनोला वेब सिरीजसाठी अनेक ऑफर्स आल्याची माहिती आहे. काही डिजिटल शोजच्या निर्मात्यांनी त्यांच्या नवीन शोजमधील प्रमुख भूमिकेसाठी डिनोला ऑफर दिली आहे.  या सगळ्यातून त्याने २-३ कथांची निवड केली आहे ज्यातून त्याचे अभिनयकौशल्य अधिक सिद्ध होईल. या सीरिजमधल्या भूमिकेवर काम करायला डिनोने सुरुवात केली असून फेब्रुवारीपासून शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

 १९९९ मध्ये 'प्यार में कभी कभी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या डिनो मोरियाने 'राज', 'गुनाह', 'ओम शांती  ओम', 'हॅपी न्यु इअर' आदी चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या स्मार्ट लुकमुळे रॅँपवर त्याची वेगळीच ओळख आहे. मात्र चित्रपटात त्याला फारसे यश मिळू शकले नाही. 

Web Title: Very soon dino moria will seen in web series