‘तुंबाड २’ मध्ये 'या' आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीची लागली वर्णी! कोण आहे ती? अपडेट आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:09 IST2026-05-06T09:07:42+5:302026-05-06T09:09:19+5:30
‘तुंबाड २’मध्ये या बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री पक्की, काय असणार भूमिका? अपडेट समोर

‘तुंबाड २’ मध्ये 'या' आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीची लागली वर्णी! कोण आहे ती? अपडेट आली समोर
Tumbbad 2 Female Lead: दरवर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित असतात, बऱ्याचदा हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. मात्र, त्यांच्या कथानकामुळे हळूहळू लोक चित्रपटाला पसंती देतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘तुंबाड’. सोहम शाह दिग्दर्शित‘तुंबाड’ हा हॉरर चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, नुकतीच या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा झाल्याने प्रेक्षकांमध्ये याबद्दल आणखी उस्तुकता वाढली आहे. अशातच या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
‘तुंबाड २’ ची घोषणा झाल्यापासून यामध्ये कोणते कलाकार झळकणार असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला होता. त्यात आता या हॉरर चित्रपटामध्ये एका बॉलिवूड सुंदरीची वर्णी लागल्याचं बोललं जात आहे.त्याचबरोबर आता सिनेमात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे, याबद्दल देखील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ‘तुंबाड’ च्या सीक्वलमध्ये अभिनेत्री आलिया भट्टची एन्ट्री झाल्याची अपडेट मिळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आलियाला पटकथा इतकी आवडली की तिने लगेचच होकार दिला. ‘तुंबाड २’ च्या शूटिंगची तयारी सध्या मुंबईत सुरु आहे. सिनेमातआलिया भटची महत्त्वाची भूमिका असणार आहे. शिवाय आलियाने या चित्रपटाचं शूटिंग देखील सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदेश प्रसाद यांनी केलं आहे.
दरम्यान, आलिया भट्टचे इतरही अनेक मोठे प्रोजेक्ट्स प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत, ज्यात 'लव्ह अँड वॉर'चा समावेश आहे. या प्रोजेक्ट्समध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत काम करणार आहे.