teaser out : ​ काजोलचे चाहते असाल तर ‘व्हिआयपी2’चा टीजर करेल तुमची निराशा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 07:02 AM2017-06-08T07:02:52+5:302017-06-08T12:32:52+5:30

‘व्हिआयपी2’च्या टीजरकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कारण धनुषच नाही तर यात तुम्हा-आम्हा सगळ्यांची आवडती काजोलही दिसणार आहे. अर्थात काजोलची एक झलक पाहण्यासाठी तुम्ही ‘व्हिआयपी2’चा टीजर पाहणार असाल तर तुमची निराशा होण्याची शक्यता आहे.

teaser out: If you are a Kajol fan, you will be disappointed with the 'VIP2' teaser! | teaser out : ​ काजोलचे चाहते असाल तर ‘व्हिआयपी2’चा टीजर करेल तुमची निराशा!

teaser out : ​ काजोलचे चाहते असाल तर ‘व्हिआयपी2’चा टीजर करेल तुमची निराशा!

googlenewsNext
ुषचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘व्हिआयपी2’चा टीजर आज रिलीज झाला. हा टीजर स्वत: अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केला. अमिताभ व धनुष ‘शमिताभ’मध्ये एकत्र दिसले होते. खरे तर ‘व्हिआयपी2’च्या टीजरकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कारण धनुषच नाही तर यात तुम्हा-आम्हा सगळ्यांची आवडती काजोलही दिसणार आहे. अर्थात काजोलची एक झलक पाहण्यासाठी तुम्ही ‘व्हिआयपी2’चा टीजर पाहणार असाल तर तुमची निराशा होण्याची शक्यता आहे. 
होय, ‘व्हिआयपी2’चा टीजर चांगलाच इंटरेस्टिंग आहे. पण यात काजोल कुठेही नाही. तिची एक साधी झलकही नाही. काजोलच्या चाहत्यांसाठी ही निश्चितपणे निराशाजनक बाब आहे. पण तरिही हा टीजर पाहायला हरकत नाही.



काजोल प्रथमच धनुषसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे काजोल १९ वर्षांनंतर तामिळ सिनेमात कमबॅक करतेय. त्यामुळे ‘व्हिआयपी2’च्या टीजरमध्ये तिचे दर्शन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र असे झाले नाही. कदाचित मेकर्स काजोलच्या लूक आणि रोलबद्दल काही धमाका करणार असतील. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत हिने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यावर्षी धनुषच्या बर्थ डेला म्हणजेच २८ जुलैला हा चित्रपट रिलीज होतो आहे. 
हा चित्रपट २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘व्हेलायिला पट्टधारी’ या चित्रपटाचा सीक्वल आहे.  काही दिवसांपूर्वीच रजनीकांत या चित्रपटाच्या सेटवर पोहोचले होते. त्यावेळी सर्वांनीच रजनीकांत यांचे आशीर्वाद घेतले होते. काजोल या चित्रपटात काम करीत असल्याने रजनीकांत खूपच आनंदी आहेत. शिवाय काजोलचा पती अजय देवगणही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. 

Web Title: teaser out: If you are a Kajol fan, you will be disappointed with the 'VIP2' teaser!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.