​तापसी पन्नूने स्पॉटबॉयला दिले अनोखे गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 17:46 IST2017-02-28T12:16:38+5:302017-02-28T17:46:38+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आता चांगलीच स्थिरावली आहे. ‘पडोसन’ या चित्रपटातून आपले बॉलिवूड करिअर सुरू करणाºया तापसीच्या खात्यात ‘बेबी’ ...

Tapi Pannu spotted an unusual gift gift! | ​तापसी पन्नूने स्पॉटबॉयला दिले अनोखे गिफ्ट!

​तापसी पन्नूने स्पॉटबॉयला दिले अनोखे गिफ्ट!

लिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आता चांगलीच स्थिरावली आहे. ‘पडोसन’ या चित्रपटातून आपले बॉलिवूड करिअर सुरू करणाºया तापसीच्या खात्यात ‘बेबी’ व ‘पिंक’ या सारख्या चित्रपटातील दमदार भूमिका आहेत. मागील सहा वर्षांपासून स्ट्रगल करणाºया तापसीच्या सोबत असलेल्या स्पॉटबॉयला तिने आगळे वेगळे गिफ्ट दिले आहे. या गिफ्टमुळे तिचा स्पॉटबॉयला सिंगापूर पहाता येणार आहे. 

अभिनेत्री तापसी पन्नूसोबत सोबत काम करणारºया स्पॉटबॉयला भेट म्हणून सिंगापूर ट्रिपला पाठविले आहे. तापसनी आपल्या कर्मचाºयांप्रती दाखविलेल्या या सहृदयपणामुळे तिची प्रशंसा केली जात आहे. नेहमी लाईमलाईटमध्ये राहणाºया सेलिब्रटीज आपल्या कर्मचाºयांची काळजी घेत असतील का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. यावर तापसीने आपल्या कृतीने उत्तर दिले आहे, असेच म्हणावे लागेल. तिने आपल्या स्पॉटबॉयला सुट्टीसाठी चक्क सिंगापूरला जाण्याचा खर्च उचलून मालक आणि नोकर यांच्यातील दरी मी ठेवत नाही असेच सांगितले आहे, बॉलिवूड कलावंतांच्या सुट्ट्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. तापसीच्या या निर्णयाने मात्र स्पॉटबॉयची सुट्टी चर्चेत आली आहे. आपल्यासोबत काम करणाºया  कर्मचाºयांना देखील आनंदी आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे तापसीला म्हणायचे असेल. यामुळेच तिने स्व:खचार्ने स्पॉटबॉयला सिंगापूरला सुट्टीसाठी पाठविले. हा स्पॉटबॉय मागील ६ वर्षापासून तिच्यासोबत काम करतो आहे.

 स्पॉटबॉयला रोजच्या कामातून येणारा थकवा घालविण्यासाठी सुट्टी देणे गरजेचे आहे. ही सुट्टी देताना त्याला पूर्ण आराम मिळेल याची काळजी घ्यायला हवी, असे तापसीने सांगितले. एखाद्या कर्मचाºयाला सुट्टीपेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट मोठी नसते, असेही ती म्हणाली. बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी आपल्यासोबत काम करणाºयांनी अशी वागणूक द्यावी, याचा संदेशच तापसीने तिच्या वर्तनातून दाखवून दिला आहे.

Web Title: Tapi Pannu spotted an unusual gift gift!