Sushant Singh Rajput Suicide : रिया चक्रवर्तीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मित्राचा नोंदवला जबाब, होऊ शकतो मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 15:40 IST2020-06-22T15:39:43+5:302020-06-22T15:40:04+5:30

चौकशीदरम्यान रियाने अनेक खुलासे केलेत.

Sushant singh rajput suicide case actors close friend siddharth pitani interrogated by mumbai police | Sushant Singh Rajput Suicide : रिया चक्रवर्तीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मित्राचा नोंदवला जबाब, होऊ शकतो मोठा खुलासा

Sushant Singh Rajput Suicide : रिया चक्रवर्तीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मित्राचा नोंदवला जबाब, होऊ शकतो मोठा खुलासा

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात पोलिस तपासात गुंतले आहेत. पोलिस या प्रकरणी कोणाची ना कोणाची चौकशी करत असतात. कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवतीची झालेली चौकशी चर्चेत आहे. या चौकशीदरम्यान रियाने अनेक खुलासे केलेत. पोलिस या प्रकरणात सुशांतच्या  वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबींची सखोल चौकशी करीत आहेत.  सुशांतचा जवळचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीचा सुद्धा पोलिसांनी चौकशी केली आहे. 

सुशांतच्या निधानंतर  त्याच्या आठवणी सिद्धार्थ पिठानीने लिहिली भावूक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली होती. वांद्रे पोलिस स्टेशनबाहेर सिद्धार्थ पिठानी स्पॉट झाला. 

न्यूज 18च्या रिपोर्टनुसार सुशांतच्या आत्महत्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली गेली आहेत. यश राज फिल्मकडून सुशांतने स्वाक्षरी केलेल्या चित्रपटांची कॉन्ट्रॅक्ट कॉपी तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसारही अधिक तपास सुरू आहे. गरज पडल्यास त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असेही पोलिसांनी नमूद केले. सुशांतच्या आयुष्यातील नेमक्या समस्या शोधण्यासाठी अधिकाधिक लोकांचे जबाब नोंदवत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

Web Title: Sushant singh rajput suicide case actors close friend siddharth pitani interrogated by mumbai police