Sushant Singh Rajput : ज्या घरात झालं सुशांतचं निधन, त्या फ्लॅटला भाडेकरू मिळेना; आता मालकाने ठेवली ‘ही’ अट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:26 AM2022-12-11T11:26:58+5:302022-12-11T11:29:14+5:30

Sushant Singh Rajput : फ्लॅटमध्ये सुशांतचं निधन झालं होतं, हे कळायचं तेव्हा तेव्हा लोक हा फ्लॅट बघायलासुद्धा यायचे नाही. आता दीर्घ कालावधीनंतर हळूहळू लोक फ्लॅट बघायला येऊ लागले आहेत. मात्र...

Sushant Singh Rajput Flat Has Not Found New Tenant Owner Doesnt Want To Rent Out To Film Celeb | Sushant Singh Rajput : ज्या घरात झालं सुशांतचं निधन, त्या फ्लॅटला भाडेकरू मिळेना; आता मालकाने ठेवली ‘ही’ अट

Sushant Singh Rajput : ज्या घरात झालं सुशांतचं निधन, त्या फ्लॅटला भाडेकरू मिळेना; आता मालकाने ठेवली ‘ही’ अट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ) आज आपल्यात नाही. त्याला जाऊन आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अर्थात सुशांतच्या आठवणीत आजही चाहते हळवे होतात. सुशांतच्या निधनाने मोठा धक्का बसला. असंख्य चाहते त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत. 14 जून 2020 रोजी सुशांतने  आपल्या मुंबईतील राहत्या फ्लॅटमध्ये कथितरित्या आत्महत्या केली होती. यानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. आता ताज्या बातमीनुसार, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा हा फ्लॅट खाली. याठिकाणी कोणीही राहायला तयार नाही. सुशांतच्या  मृत्यूला अडीच वर्ष उलटून गेलंय. मात्र तरीही या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी  नवीन भाडेकरू मिळत नाहीये. आता या फ्लॅटसाठी ब्रोकरने एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

रफीक मर्चंट असं या  रिअल इस्टेट ब्रोकरचं नाव आहे.  त्याने सुंशांत राहत असलेल्या सी-फेसिंग अपार्टमेंटचा एक व्हिडीओ शेअर केला. महिन्याला पाच लाख रुपये इतकं या फ्लॅटचं भाडं असल्याचंही त्याने म्हटलंय.

या फ्लॅटमध्ये सुशांतचं निधन झालं, त्या फ्लॅटमध्ये राहायला लोक घाबरत आहेत, असं रफीकने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. फ्लॅटमध्ये सुशांतचं निधन झालं होतं, हे कळायचं तेव्हा तेव्हा लोक हा फ्लॅट बघायलासुद्धा यायचे नाही. आता दीर्घ कालावधीनंतर हळूहळू लोक फ्लॅट बघायला येऊ लागले आहेत. मात्र कोणासोबत डील पक्की होऊ शकली नाही. वांद्रे भागातील या फ्लॅटचा मालक एक एनआरआय आहे. तो आता कोणत्याच बॉलिवूड कलाकाराला हा फ्लॅट भाड्यानं देऊ इच्छित नाही. एखाद्या कॉपोर्रेट व्यक्तीला तो फ्लॅट देऊ इच्छितो आहे. पण मालक याचं भाडं कमी करायला तयार नाही. त्यामुळे अद्याप हा फ्लॅट खाली आहे, असं त्याने सांगितलं. रफीकने सुशांतच्या या खाली फ्लॅटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सुशांतने डिसेंबर 2019 मध्ये दरमहा 4.5 लाख रूपये भाड्यानं हा फ्लॅट घेतला होता. लॉकडाऊनदरम्यान तो त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीसोबत या फ्लॅटमध्ये राहिला होता. याच फ्लॅटमध्ये त्याचं निधन झालं. तो गेल्यानंतर या फ्लॅटमध्ये कोणीही राहायला तयार नाही.  

सुशांतच्या निधनाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात आहे. त्याने आत्महत्या केली होती, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडविरोधात एक लाटच निर्माण झाली.

Web Title: Sushant Singh Rajput Flat Has Not Found New Tenant Owner Doesnt Want To Rent Out To Film Celeb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.