"मला लग्न करायचंच नव्हतं...", सूरज नांबियारने केलेला खुलासा; मौनीने अल्टिमेटम दिला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:53 IST2026-05-15T16:52:11+5:302026-05-15T16:53:03+5:30

सूरज नांबियार आणि मौनी रॉय यांचा घटस्फोट झाला आहे.

suraj nambiar was against marriage institution but after mouni roy s ultimatum he married her | "मला लग्न करायचंच नव्हतं...", सूरज नांबियारने केलेला खुलासा; मौनीने अल्टिमेटम दिला अन्...

"मला लग्न करायचंच नव्हतं...", सूरज नांबियारने केलेला खुलासा; मौनीने अल्टिमेटम दिला अन्...

लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाची मनोरंजनविश्वात चर्चा आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या विभक्त होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. या धक्कादायक बातमीनंतर आता सूरज नांबियारची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या लग्नाबद्दल काही खळबळजनक खुलासे केले होते.

सूरज नांबियारने काही वर्षांपूर्वी बॉम्बे टाईम्सला मुलाखत दिली होती. त्यात त्याने कबूल केले होते की, तो सुरुवातीला लग्नाच्या विचाराच्या पूर्णपणे विरोधात होता. मौनीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही तो बराच काळ लग्नाचा निर्णय पुढे ढकलत होता. लग्नानंतर वर्षभराने पुन्हा दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की, "मी बराच काळ लग्नाच्या विरोधात होतो, पण मौनीसोबतचे वैवाहिक आयुष्य शांततेत सुरू आहे."

सूरजने या मुलाखतीत मौनीने दिलेल्या अल्टिमेटमबद्दलही सविस्तर माहिती दिली होती. तो म्हणालेला, "मौनीला नात्याच्या सुरुवातीच्या काही वर्षांतच लग्न करायचे होते. मी मात्र टाळाटाळ करत होतो. अखेर एक दिवस मौनीने मला स्पष्ट शब्दांत सांगितले की, एकतर लग्न कर नाहीतर हे नाते संपवून टाक." मौनीने दिलेल्या या अल्टिमेटममुळेच सूरजने तिला लग्नासाठी होकार दिला होता.

मौनी आणि सूरजने जानेवारी २०२२ मध्ये गोव्यात अतिशय थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र, ४ वर्षांतच या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सूरजची ही जुनी मुलाखत आता पुन्हा चर्चेत आल्याने, त्यांच्या नात्यात सुरुवातीपासूनच काही मतभेद होते का, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

Web Title: suraj nambiar was against marriage institution but after mouni roy s ultimatum he married her