लेकापेक्षा सुनील शेट्टीचीच हवा, अभिनेत्याचा फिटनेस पाहून नेटकरी म्हणतात, 'बाप कोण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 10:13 AM2023-04-16T10:13:03+5:302023-04-16T10:14:25+5:30

90 च्या दशकात एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारा अभिनेता सुनील शेट्टी कमालीचा फिट आहे.

suniel shetty looking more handsome than his son ahan shetty video viral | लेकापेक्षा सुनील शेट्टीचीच हवा, अभिनेत्याचा फिटनेस पाहून नेटकरी म्हणतात, 'बाप कोण...'

लेकापेक्षा सुनील शेट्टीचीच हवा, अभिनेत्याचा फिटनेस पाहून नेटकरी म्हणतात, 'बाप कोण...'

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) या वयातही जबरदस्त फिट आहे. नुकताच सुनील शेट्टीचा मुलगा अहानसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये लेकापेक्षा बापच हँडसम दिसतोय अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्यात. हा व्हिडिओ बघून नेटकरी अण्णा सुनील शेट्टीच्याच प्रेमात पडलेत.

90 च्या दशकात एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारा अभिनेता सुनील शेट्टी कमालीचा फिट आहे. आजही त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सुनील शेट्टीला बघून त्याच्या वयाचाही अंदाजा लावता येणार नाही. नुकतेच दोघेही एका इव्हेंटमध्ये पोहोचले असता वडील कोण आणि मुलगा कोण असा प्रश्नच पापाराझींना पडला इतका सुनील शेट्टी स्टायलिश दिसत होता. त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

'मुलापेक्षा सुनील सरच हँडसम दिसत आहेत' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर काहींनी त्याला फिटनेसचं रहस्य विचारलं आहे. सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. त्यातही नवरीच्या वडिलांचीच जास्त हवा बघायला मिळाली.

Web Title: suniel shetty looking more handsome than his son ahan shetty video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.