बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याचा अपमान? चालू कार्यक्रमात स्टेज सोडला, म्हणतात- "मी त्यांना आधीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:43 IST2026-04-22T13:38:25+5:302026-04-22T13:43:31+5:30

७२ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचा अपमान झाल्याची चर्चा आहे. या अभिनेत्याने चालू कार्यक्रमात स्टेज सोडल्याने त्यांची चर्चा झाली. आता या अभिनेत्याने सविस्तर खुलासा केला आहे

Sudhir Pandey Reacts To Video Of Him Walking Off Stage At Ginny Weds Sunny 2 Trailer Launch | बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याचा अपमान? चालू कार्यक्रमात स्टेज सोडला, म्हणतात- "मी त्यांना आधीच..."

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याचा अपमान? चालू कार्यक्रमात स्टेज सोडला, म्हणतात- "मी त्यांना आधीच..."

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुधीर पांडे (sudhir pandey) सध्या त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. 'गिनी वेड्स सनी २' (Ginny Weds Sunny 2) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातून ते रागात स्टेज सोडून बाहेर पडल्याचे दिसत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुधीर पांडेंचा अपमान झाल्याने त्यांनी स्टेज सोडला अशा चर्चा रंगला. आता सुधीर यांनीच या प्रकरणावर मौन सोडलंय.

ज्येष्ठ अभिनेते सुधीर पांडे यांनी 'एचटी सिटी'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रेलर लाँच सोहळ्यातून अचानक बाहेर पडण्यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या दुसऱ्या एका प्रोजेक्टचे शूटिंग सुरू होते आणि तिथे पोहोचण्यासाठी त्यांना उशीर होत होता, म्हणूनच ते स्टेजवरून मध्येच निघून गेले होते. तिथे त्यांचा कोणताही अपमान घडला नव्हता, हेही त्यांनी स्पष्ट केले.


सुधीर पांडे म्हणाले, "अपमान झाल्यासारखे काहीच नव्हते. मला टीमसोबत ट्रेलर लाँचच्या वेळी उपस्थित राहायचे होते, म्हणून मी तिथे गेलो होतो. मी सर्वांसोबत स्टेजवरही गेलो आणि त्याआधी पहिल्या रांगेत बसलो होतो. ज्याने हा व्हिडिओ शूट केला, त्याने कदाचित या गोष्टीकडे लक्ष दिले नसेल."

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "अडचण ही होती की मला खूप घाई होती, कारण माझ्या दुसऱ्या प्रोजेक्टचे शूटिंग सुरू होते. मी शूटिंगच्या मधूनच या सोहळ्यासाठी आलो होतो. मी 'गिनी वेड्स सनी २' च्या प्रोडक्शन हाऊसला आधीच कल्पना दिली होती की मला लवकर निघावे लागेल. मला दुसऱ्या शूटिंगसाठी सतत मेसेज येत होते, म्हणूनच मी घाईत स्टेजवरून खाली उतरलो.", अशाप्रकारे सुधीर यांनी घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.

Web Title : सुधीर पांडे ने स्टेज छोड़ने पर स्पष्टीकरण दिया, अपमान से इनकार किया।

Web Summary : अभिनेता सुधीर पांडे ने वायरल वीडियो अफवाहों को संबोधित किया। उन्होंने स्पष्ट किया कि 'गिन्नी वेड्स सनी 2' के ट्रेलर लॉन्च से मंच से बाहर निकलने का कारण फिल्म की शूटिंग थी, न कि कोई अपमान। उन्होंने प्रोडक्शन हाउस को पहले ही अपनी समय की कमी के बारे में बता दिया था।

Web Title : Sudhir Pandey clarifies stage exit, denies insult at event.

Web Summary : Veteran actor Sudhir Pandey addressed viral video rumors. He clarified his hurried stage exit from 'Ginny Weds Sunny 2' trailer launch was due to a conflicting film shoot, not any perceived insult. He had pre-informed the production house about his time constraint.