साउथची 'ती' सौंदर्यवती! पहिल्याच चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्रींची केली हवा टाईट, ३२ व्या वर्षी दुर्देवी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:50 IST2026-04-17T15:45:29+5:302026-04-17T15:50:54+5:30
दक्षिणेकडील 'हेमामालिनी' म्हणून होती प्रसिद्ध, अभिनयानंतर राजकारणात उतरली, बिग बिंच्या नायिकेचा अंत चटका लावणारा

साउथची 'ती' सौंदर्यवती! पहिल्याच चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्रींची केली हवा टाईट, ३२ व्या वर्षी दुर्देवी निधन
Actress Saundary: सेटमॅक्सवर कायम लागणारा चित्रपट म्हणजे सूर्यवंशम.टीव्हीवर हा चित्रपट इतक्या लागला आहे की, बर्याच लोकांना यातील संवाददेखील पाठ झाले आहेत.हा चित्रपट लागला की डोळ्यासमोर अमिताभ बच्चनसह त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार्या अभिनेत्री सौंदर्याचा चेहरा उभा राहतो.दुर्दैवाने हा चित्रपट तिचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला आणि अखेरचा ठरला. या अभिनेत्रीच्या निधनाला आज २२ वर्ष पूर्ण झाली आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या नायिकेचं १७ एप्रिल २००४ रोजी निधन झालं. मृत्यूदरम्यान अभिनेत्री सात महिन्यांची गर्भवती होती, अशी देखील माहिती समोर आली होती.
दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री या चित्रपटाने पहिल्यांदा हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र, नशिबाने तिला दगा दिला.सौंदर्याचा जन्म १८ जुलै १९७२ साली कोलार (कर्नाटक) येथे झाला.सौंदर्याने शिक्षण घेत एमबीबीएसला प्रवेश मिळविला. एमबीबीएस सुरु असताना सॉफ्टवेअर इंजिनिअर जीएस रघु यांच्याशी तिचा विवाह झाला आणि तिने शिक्षण सोडले.घरात सुरुवातीपासूनच अभियाची पार्श्वभूमी असल्यामुळे तिचा इंडस्ट्रीतील प्रवास सुखकर झाला.
अभिनेत्रीची कारकीर्द
१९९२ मध्ये आलेल्या गंधर्वा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.त्यानंतर अभिनेत्रीने तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेह जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात सर्वाधिक तेलगू चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. सावळा रंग, मोठे डोळे आणि अभिनयामुळे सौंदर्याने अवघी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी व्यापून टाकली. त्याकाळातील आघाडीचे अभिनेते चिरंजीवी, रजनीकांत, रघु यांच्यासोबत तिने काम केलं. तिचे चाहते तिला दक्षिणेची हेमामालिनी म्हणत असत.
प्रसिध्दीमुळे सौंदर्याला इतर दाक्षिणात्य अभिनेत्यांप्रमाणे राजकीय क्षेत्र खुणावू लागले होते. त्यामुळे तिने भारतीय जनता पार्टीचे सभासदत्व घेतले. १७ एप्रिल २००४ मध्ये बंगलोर येथून आंध्रप्रदेशात एका प्रचारसभेसाठी जात असताना काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आग लागून ते विमान कोसळलं. या अपघातात सौंदर्यासह पायलट, भाजपा कार्यकर्ता सर्वांचेच निधन झालं. भविष्यातील यशाचे कायम स्वप्न पाहणार्या ह्या अभिनेत्रीने वयाच्या ३२ व्या वर्षीच या जगातून एक्झिट घेतली. सौंदर्याच्या मृत्यूनंतर तिचा अपथामित्रा हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला. यातील भूमिकेकरिता तिला मरणोत्तर सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.