​मुले जन्माला घालण्यासाठी आलियाला हवा आहे सिध्दार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 16:15 IST2016-08-13T10:45:46+5:302016-08-13T16:15:46+5:30

अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे प्रेमप्रकरण सर्वांनाच परिचीत आहे. मात्र बॉलिवूडमध्ये कधी काही होईल सांगता येत नाही. ...

Siddharth wants Alia to have children! | ​मुले जन्माला घालण्यासाठी आलियाला हवा आहे सिध्दार्थ !

​मुले जन्माला घालण्यासाठी आलियाला हवा आहे सिध्दार्थ !


/>अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे प्रेमप्रकरण सर्वांनाच परिचीत आहे. मात्र बॉलिवूडमध्ये कधी काही होईल सांगता येत नाही. कुणाचे लग्नानंतर ब्रेकअप होते तर कुणाचे लग्नाच्या आधीच. आपला जोडीदार आयुष्यभर आपल्यासोबतच राहिल याची शाश्वती नसते. तरीही आलियाला आपला बॉयफ्रेंड सिद्धार्थवर पूर्णत: विश्वास आहे आणि ती त्याच्या मुलांची आई होण्याचे स्वप्न पाहु लागली आहे.
अलिकडेच एका आघाडीच्या चॅनलशी बोलताना न कळतपणे आलियाने याची कबुली दिली आहे. ‘तू जर पृथ्वीवरील शेवटची महिला असशील आणि मुलं जन्माला घालायची असतील तर रणवीर सिंग, सिध्दार्थ मल्होत्रा, वरुण धवन, शाहिद कपूर आणि रणबीर कपूर यांच्यापैकी साथीदार म्हणून कोणाची निवड करशील? ''असा प्रश्न आलियाला विचारण्यात आला होता. यावर सेकंदाचाही वेळ न दवडता आलियाने सिध्दार्थचे नाव घेतले.

Web Title: Siddharth wants Alia to have children!