आयुष्यमान खुराणा अन् भूमी पेडणेकरने सुरू केले ‘शुभमंगल सावधान’चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 17:06 IST2017-03-01T11:36:37+5:302017-03-01T17:06:37+5:30

​अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांनी राजधानी दिल्ली येथे आगामी ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

Shooting of 'Shubhamangal Suraksha' started with life-long Khurana and Pudanekar | आयुष्यमान खुराणा अन् भूमी पेडणेकरने सुरू केले ‘शुभमंगल सावधान’चे शूटिंग

आयुष्यमान खुराणा अन् भूमी पेडणेकरने सुरू केले ‘शुभमंगल सावधान’चे शूटिंग

िनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांनी राजधानी दिल्ली येथे आगामी ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. निर्माता आनंद एल. राय यांनी सिनेमातील कलाकार आणि क्लॅपबोर्डसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, ‘शुभ हो, ‘शुभमंगल सावधान’च्या शूटिंगला सुरुवात. गॉड इज किंग. आर. एस. प्रसन्ना, आयुष्यमान खुराणा, भूमी पेडणेकर, कृशिका लुल्ला यांचे अभिनंदन, असे लिहिले आहे. गेल्या मंगळवारीच आयुष्यमानने ट्विट करून सांगितले होते की, सिनेमाची संपूर्ण टीम दिल्ली येथे रवाना झाली आहे. 

यावेळी ट्विटमध्ये आयुष्यमानने लिहिले होते की, ‘शुभमंगल सावधान’च्या रोमांचक प्रवासासाठी मी दिल्लीला रवाना होत आहे. त्याचबरोबर आनंद एल. राय, भूमी पेडणेकर आणि आर. एस. प्रसन्ना हेदेखील निघाले आहेत. दुसºयांदा भूमी आणि आयुष्यमान एकत्र काम करीत आहेत. या अगोदर दोघेही नॅशनल अवॉर्ड फिल्म ‘दम लगा के हईशा’मध्ये एकत्र बघायवास मिळाले होते. शुभमंगल सावधान तामिळ सिनेमा ‘कल्याण समयाल साधम’ याचा रिमेक आहे. या सिनेमाचे मूळ दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. 

आयुष्यमानने याअगोदरच भूमीसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. तर भूमीनेही नुकतेच इन्स्टाग्रामवर आयुष्यमानचे काही फोटो शेअर करून त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. ‘दम लगा के हईशा’मध्ये भूमी आणि आयुष्यमानची केमिस्ट्री चांगलीच जमली होती. विशेषत: भूमीने साकारलेली हेवीवेट भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. आता पुन्हा हे दोघे एकत्र येत असल्याने त्यांच्यातील केमिस्ट्री कशी रंगणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. शुभमंगल सावधान व्यतिरिक्त भूमी अक्षय कुमारसोबत ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा लवकरच रिलिज होणार आहे. 

Web Title: Shooting of 'Shubhamangal Suraksha' started with life-long Khurana and Pudanekar