​शाहरुखला अमेरिकन विमानतळावर चौकशीसाठी पुन्हा घेतले ताब्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 12:11 IST2016-08-12T06:41:06+5:302016-08-12T12:11:06+5:30

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याने त्याने ट्वीट करुन झालेल्या प्रकाराबाबत नाराजी ...

Shahrukh takes possession of American airport again for questioning! | ​शाहरुखला अमेरिकन विमानतळावर चौकशीसाठी पुन्हा घेतले ताब्यात !

​शाहरुखला अमेरिकन विमानतळावर चौकशीसाठी पुन्हा घेतले ताब्यात !


/>बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याने त्याने ट्वीट करुन झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही वेळानंतर त्याला चौकशी करुन सोडण्यात आले. अमेरिकेतील इमिग्रेशन विभागाने शाहरूखला विमानतळावर रोखून ठेवले होते मात्र याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सुरक्षा व्यवस्थेचा आदर आहे, पण प्रत्येक वेळी असे प्रकार होणं चांगलं नसल्याचं शाहरुखने म्हटलं आहे.
शाहरूखसोबत २०१२ मध्येही न्यूयॉर्क एअरपोर्टवर असाच घडला होता. यानंतर अमेरिकेने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शाहरुखला २००९ मध्येही न्यू जर्सी येथे अडवण्यात आलं होतं. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘स्पॉटेड’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी जात होता.

Web Title: Shahrukh takes possession of American airport again for questioning!