अक्षय कुमारनंतर 'हा' अभिनेताही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:25 PM2024-02-04T16:25:44+5:302024-02-04T16:27:37+5:30

अक्षय कुमारनंतर आता 'या' अभिनेत्याला छत्रपतींची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी

Shahid Kapoor will also play the role of Chhatrapati Shivaji Maharaj in big budget historical cinema | अक्षय कुमारनंतर 'हा' अभिनेताही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सुकता

अक्षय कुमारनंतर 'हा' अभिनेताही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सुकता

छत्रपती शिवाजी महाराज यांची एखाद्या सिनेमात किंवा नाटकात भूमिका साकारायची संधी मिळणं म्हणजे भाग्यच. अनेकांनी आतापर्यंत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. अक्षय कुमारही आगामी सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. होय आगामी बिग बजेट ऐतिहासिक ड्रामामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी एका आघाडीच्या अभिनेत्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्याचं नाव आता जवळपास फायनलही करण्यात आलंय.

संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावत' सिनेमात शाहीदने राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारली होती. या ऐतिहासिक भूमिकेत तो शोभून दिसला होता. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, OMG 2 चे दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत शाहीद या प्रोजेक्टवर चर्चा करत आहे. अश्विन वर्दे सिनेमाची निर्मिती करणार आहेत. दोघांमधील चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. सिनेमाचं नाव आणि इतर स्टारकास्ट याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र शाहीदला छत्रपतींच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

OMG 2 चे दिग्दर्शक अमित राय यांनी आतापर्यंत 4 सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये OMG 2 शिवाय 'रोड टू संगम' आणि एक मराठी सिनेमा 'तिंग्या' चाही समावेश आहे. तर त्यांचा शेवटचा सिनेमा 2023 मथध्ये प्रदर्शित झाला जो पंजाबी सिनेमा आहे. तर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील हा सिनेमा 5 वा असेल.

शाहीद कपूर सध्या आगामी 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय त्याचा 'देवा' हा सिनेमाही यावर्षी येणार आहे. 

Web Title: Shahid Kapoor will also play the role of Chhatrapati Shivaji Maharaj in big budget historical cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.