शाहिद कपूरला मिळाली स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 11:32 IST2018-06-27T11:32:37+5:302018-06-27T11:32:37+5:30

हिरोने आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करण्यात सध्या कुणालाच काहीही गैर वाटत नाही. म्हणूनच चाळीशी ओलांडलेले बॉलिवूडच्या तिन्ही ...

Shahid Kapoor got himself younger than 15 years! | शाहिद कपूरला मिळाली स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान हिरोईन!

शाहिद कपूरला मिळाली स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान हिरोईन!

रोने आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करण्यात सध्या कुणालाच काहीही गैर वाटत नाही. म्हणूनच चाळीशी ओलांडलेले बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’ला आपल्यापेक्षा कमी वयाच्या हिरोईन्स हव्या असतात. बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या मुलीही ‘खान’सोबत काम करण्यास एका पायवर तयार असतात. आता शाहिद कपूरही ‘खान’च्या रांगेत आला आहे. होय, शाहिद कपूर स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री कोण तर तारा सुतारिया. 
गतवर्षी आलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर लीड भूमिकेत असणार आहे आणि यात तारा सुतारिया ही २२ वर्षांची मुलगी त्याची हिरोईन म्हणून दिसणार आहे.



तारा सुतारिया लवकरच ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’मधून बॉलिवूड डेब्यू करतेय. यात ती टायगर श्रॉफसोबत दिसतेय. डेब्यू सिनेमा रिलीज होण्याआधीच ताराच्या हाती दुसरा मोठा चित्रपट लागलायं.
‘अर्जुन रेड्डी’मध्ये विजय देवरकोंडा लीड भूमिकेत दिसला होता. या भूमिकेसाठी विजयला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळवून दिला. हीच भूमिका आता शाहिद कपूर साकारणार. तो यात एका सर्जनच्या भूमिकेत दिसेल. त्याच्या प्रेयसीचे दुस-यासोबत लग्न होते आणि यानंतर सर्जनचे आयुष्यचं बदलते. तो स्वत:ला नशेत बुडवून घेतो, स्वत:ला स्वत:हून उद्ध्वस्त करायला निघतो.

ALSO READ : शाहिद कपूरच्या हात धुवून मागे लागली होती ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी! 

तारा या चिपटात शालिनी पांडे ही व्यक्तिरेखा साकारतान दिसेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची ही लीडिंग लेडी अतिशय निष्पाप चेह-याची आहे. त्यामुळे मेकर्सला यासाठी नवा चेहरा हवा होता. सुरूवातीला या भूमिकेसाठी जान्हवी कपूर व सारा अली खान यांच्या नावांचाही विचार झाला. पण अखेर ताराने ही संधी पटकावली. ‘अर्जुन रेड्डी’चे दिग्दर्शक संदीप वांगा हेच हिंदी चित्रपटही दिग्दर्शित करणार आहेत. 

Web Title: Shahid Kapoor got himself younger than 15 years!