​ पाहा सोनारीकाचा बिकिनी लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 17:34 IST2017-01-06T17:33:51+5:302017-01-06T17:34:58+5:30

सोनारीका भडोरीयाने टिव्हीवर पार्वतीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मने जिंकली होती. सोनारीकाची व्यक्तिरेखा पावर्तीच्या रुपातून घराघरता पोहचली होती. साडी, दागिने ...

See Sonrika's Bikini Look | ​ पाहा सोनारीकाचा बिकिनी लुक

​ पाहा सोनारीकाचा बिकिनी लुक

नारीका भडोरीयाने टिव्हीवर पार्वतीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मने जिंकली होती. सोनारीकाची व्यक्तिरेखा पावर्तीच्या रुपातून घराघरता पोहचली होती. साडी, दागिने अशा पारंपारिक वेशातील सोनारीकाने आता कात टाकली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. नुकतेच सोनारीकाचे काही बिनधास्त फोटो सोशल साईट्सवर व्हायरल झाले आहेत. सोनारीकाने साडीत नाहीत तर चक्क बिकिनीमध्ये समुद्रकिनारी फोटो काढले आहेत. मालिकेमध्ये सोज्वळ, सालस रुपात दिसणारी सोनारीका आता एकदमच बोल्ड अ‍ॅन्ड बिनधास्त झाल्याचे दिसत आहे. सोनारीकाने नुकतेच एका हिंदी चित्रपटात काम केले आहे. सांसे या हॉरर चित्रपटामध्ये सोनारीका आपल्याला रजनीश दुग्गल सोबत रोमान्स करताना दिसली होती. सोनारीकाने सोशलसाईट्सवर शेअर केलेल्या तिच्या या हॉट फोटोजवर नेटिझन्सनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. बºयाच लोकांच्या रोषाला सोनारीकाला सामोरे जावे लागले आहे. सोनारीकाला तिच्या चाहत्यांनी या फोटोजसाठी चांगलेच फटकारले आहे. एवढेच नाही तर तिला हे फोटो काडून टाकण्याचा देखील सल्ला दिला आहे. या सर्व गोष्टींचा सामना सोनारीकाने केला आहे. पण ते काहीही असले तरी सोनारीकाचे हे बिकिनीतील फोटो अगदी झक्कास दिसत आहेत. या फोटोजमध्ये सोनारीका एकदम स्टनिंग आणि गॉर्जिअस दिसत आहे. सोनारीका सध्या काय करतेय हे तर माहित नाही. परंतू तिने तमाम प्रेक्षकांना या फोटोजमुळे घायाळ केले हे मात्र खरे. आता हे फोटो पाहून सागरीकाना नक्कीच ग्लॅमरस भूमिकांसाठी विचारणा होऊ शकते. त्यामुळे जर आपल्याला आगामी काही चित्रपटांमध्ये बिकिनी घातलेली, हॉट अंदाजातील सोनारीका दिसली तर जास्त आश्चर्य वाटायला नको. सोनाराकाच्या या फोटोला नेटवर अनेकांनी फटकारले जरी असले तरी या फोटोची प्रशंसा देखील अनेकांनी केली आहे. 

 

Web Title: See Sonrika's Bikini Look