'सैयारा' फेम अभिनेत्री अनीत पड्डावर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजोबांचं निधन; भावुक होत म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:30 IST2026-04-21T10:28:49+5:302026-04-21T10:30:07+5:30

अनीत पड्डाच्या आजोबांचं निधन, अभिनेत्री झाली भावुक; पोस्ट वाचून डोळे पाणावतील 

saiyaara movie fame actress aneet padda grandfather passed away share emotional post | 'सैयारा' फेम अभिनेत्री अनीत पड्डावर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजोबांचं निधन; भावुक होत म्हणाली... 

'सैयारा' फेम अभिनेत्री अनीत पड्डावर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजोबांचं निधन; भावुक होत म्हणाली... 

Aneet Padda: मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अनीत पड्डा (Aneet Padda). अभिनेत्री अनीत पड्डावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या लाडक्या आजोबांचं निधन झालं आहे.अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करुन ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली. आजोबांचं निधन झाल्याने  अनीतने भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


अनीत पड्डाने तिच्या आजोबांचा हात धरलेला स्वतःचा एक ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो शेअर केला आहे. तिने त्यासोबत लिहिलंय,  “तुम्ही माझ्या आयुष्यातली खास व्यक्ती होता. तुम्ही आम्हाला सोडून जात होता, पण 'मखन'ला कधीच विसरलानाहीत. तुम्ही कायम आठवणी आणि प्रेम जपलतं. मी सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करेन."

मग पुढे अनीतने म्हटलंय,  “आपण एकत्र घालवलेले सर्व क्षण मी कायम जपून ठेवेन. मी एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करेन. तुमचे विनोद, तुमची दयाळू वृत्ती आणि तुमच्या गोष्टी मी नेहमी आठवणीत ठेवेन.आज मी आकाशात सर्वात तेजस्वी तारा पाहिला आणि मला समजलं की तुम्ही तिथे आहात. आजोबा, मी तुम्हाला कायम प्रेम करत राहीन.” या ओळींनी अनेक चाहत्यांना भावूक केले आहे.अनीतच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.तसंच चाहत्यांनीही तिला धीर देत भावनिक पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, अनीत पड्डाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सैयारानंतर ती मोहित सुरींच्या आणखी एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्या आगामी शक्ती शालिनी या चित्रपटामुळे देखील ती प्रचंड चर्चेत आहे.

Web Title : 'सैयारा' फेम अभिनेत्री अनीता पड्डा के दादाजी का निधन; शोक व्यक्त

Web Summary : 'सैयारा' फेम अभिनेत्री अनीता पड्डा ने अपने दादाजी के निधन पर शोक व्यक्त किया। सोशल मीडिया पर एक भावुक पोस्ट साझा करते हुए, प्यार और यादों को व्यक्त किया। प्रशंसकों ने संवेदना व्यक्त की।

Web Title : 'Saiyaara' Fame Actress Aneet Padda's Grandfather Passes Away; Expresses Grief

Web Summary : Actress Aneet Padda, known for 'Saiyaara,' mourns her grandfather's death. She shared a heartfelt social media post, expressing love and cherished memories. Fans offer condolences.