Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर शूटरने काढला पळ; CCTV फुटेज आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:06 IST2026-02-14T12:03:40+5:302026-02-14T12:06:27+5:30

Rohit Shetty : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Rohit Shetty house firing case mumbai shooter escaped cctv footage surfaced | Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर शूटरने काढला पळ; CCTV फुटेज आलं समोर

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर शूटरने काढला पळ; CCTV फुटेज आलं समोर

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता एक नवीन सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आलं असून त्यामध्ये आरोपी शूटर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून वेगाने पळताना दिसत आहे. पोलीस या व्हिडिओला तपासातील एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानत आहेत.

१ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती. घटनेनंतर मुंबई पोलिसांनी विलेपार्ले (पश्चिम) येथील एका हॉटेलजवळून एक बेवारस स्कूटर जप्त केली. हे ठिकाण 'शेट्टी टॉवर'पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे. आरोपी याच स्कूटरवरून आले होते आणि गुन्ह्यानंतर ती तिथेच सोडून पसार झाले असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगमधील हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंह, रोहित शेट्टीला धमकी; ऑडिओ व्हायरल

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, स्कूटरवरील पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. या टीमने स्कूटरवरून फिंगरप्रिंट्स, डीएनए नमुने आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळणं सोपं होईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

ना लोकेशन, ना कॉलिंग... नवी मोडस ऑपरेंडी; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे फरार

सेकंड हँड स्कूटर आणि कटाचा पर्दाफाश

तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की, ही 'होंडा डियो' स्कूटर पुण्यातील कर्वे नगर येथील रहिवासी अमन मरोटे याच्याकडून विकत घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी ५ आरोपींना अटक केली असून त्यापैकी १९ वर्षीय आदित्य गायकी याने ही स्कूटर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

घरावर झालेल्या गोळीबारानंतर रोहित शेट्टीने सर्व प्लॅन्स केले रद्द; जवळच्या मित्रांना केली 'ही' विनंती

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या मध्यात सुमारे ३० हजार रुपयांना ही स्कूटर खरेदी करण्यात आली होती. समर्थ पोमाजी याच्या सूचनेनुसार आणि शुभम लोणकर याच्या सांगण्यावरून ही खरेदी झाली होती, ज्यासाठी स्वप्नील सकट याने पैसे पुरवले होते. सध्या पोलीस सर्व आरोपींची सखोल चौकशी करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे.
 

Web Title : रोहित शेट्टी के घर पर गोलीबारी: शूटर फरार; सीसीटीवी फुटेज आया सामने।

Web Summary : रोहित शेट्टी के घर पर गोलीबारी के बाद, सीसीटीवी फुटेज में शूटर भागता हुआ दिखाई दे रहा है। पुलिस ने एक स्कूटर जब्त किया है जिसके बारे में संदेह है कि इसका इस्तेमाल आरोपी ने किया था। पांच गिरफ्तारियां हुई हैं, और जांच जारी है।

Web Title : Rohit Shetty's house firing: Shooter flees; CCTV footage surfaces.

Web Summary : After the firing at Rohit Shetty's home, CCTV footage shows the shooter fleeing. Police seized a scooter suspected to be used by the accused. Five arrests have been made, and the investigation continues, focusing on forensic evidence and the motive behind the attack.