अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 14:38 IST2019-05-23T14:37:39+5:302019-05-23T14:38:14+5:30

रणवीरने दीपिकाचा कान्समधील एक क्यूट फोटो शेअर केला आहे.

Ranveer Singh shares Deepika Padukone’s pic with baby face filter, fans can’t get enough of her cuteness | अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो

अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो

दीपिका पादुकोण काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील रेड कार्पेटवर आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली. तिने या फेस्टिव्हलमधील बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि तिच्या या फोटोंवर तिचा नवरा रणवीर सिंगने खूप क्यूट कमेंट्स केले. तर आता चक्क रणवीरनेच दीपिकाचा कान्समधील एक क्यूट फोटो शेअर केला आहे.


नुकताच फ्रान्समधील कान्स शहरात कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडले. या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील काही तारकांनी हजेरी लावली होती. या फेस्टिव्हलमधील दीपिका पादुकोणचे काही लूक्स समोर आले आहेत. या लूकमधील दीपिकाचा ग्रीन गाऊनमधील लूकची सगळीकडे खूप चर्चा झाली. या तिच्या स्टाईलची तुलना रणवीर सिंगसोबतही करण्यात आली. आता तर दीपिकाचा तोच फोटो रणवीरने बेबी फिल्टर टाकून शेअर केला. या फोटोत ती खूप क्यूट दिसते आहे. 


दीपिका कान्स फेस्टिव्हल पार पडल्यानंतर भारतात परतली आहे. आता ती पुन्हा तिचा आगामी चित्रपट छपाकच्या कामाला लागणार आहे. या चित्रपटातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे.

या चित्रपटाची कथा अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे.


तर रणवीर सिंग ८३ चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात तो क्रिकेटर कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे आणि सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Web Title: Ranveer Singh shares Deepika Padukone’s pic with baby face filter, fans can’t get enough of her cuteness