video : 'धुरंधर'मधील आलम भाईंची 'ती' चहाची टपरी खरीच! बायकरनं शोधलं लोकेशन; गौरव गेराचीही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:36 IST2026-05-18T16:34:52+5:302026-05-18T16:36:30+5:30

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातील आलम भाईंची चहाची टपरी खरीखुरी आहे. या दुकानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ranveer Singh Dhurandhar Movie Alam Bhai Tea Stall Real Location Leh Ladakh Viral Video | video : 'धुरंधर'मधील आलम भाईंची 'ती' चहाची टपरी खरीच! बायकरनं शोधलं लोकेशन; गौरव गेराचीही प्रतिक्रिया

video : 'धुरंधर'मधील आलम भाईंची 'ती' चहाची टपरी खरीच! बायकरनं शोधलं लोकेशन; गौरव गेराचीही प्रतिक्रिया

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहच्या सुपरहिट ठरलेल्या 'धुरंधर' चित्रपटातील अनेक दृश्ये प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. या चित्रपटात अभिनेता गौरव गेराने साकारलेलं 'आलम भाई' हे पात्र आणि त्यांची हिरव्या रंगाची चहाची टपरी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. चित्रपटात दाखवण्यात आलेली ही टपरी म्हणजे केवळ एक काल्पनिक सेट असेल, असाच अनेकांचा समज होता. मात्र, प्रत्यक्षात ही टपरी कोणतीही सेट नसून लडाखमधील लेह येथे असलेलं एक खरंखुरं दुकान आहे. एका बायकरनं या दुकानाचं अचूक लोकेशन शोधून काढलं असून, त्याचा सोशल मीडियावरील व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवरील its_naturemoto या हँडलवरून एका ट्रॅव्हल बायकरने या दुकानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा बायकर पश्चिम बंगालमधील खडगपूरचा रहिवासी आहे. लेहच्या मुख्य मार्केटमध्ये फिरत असताना अचानक त्याचे लक्ष या दुकानाने वेधून घेतले. व्हिडीओमध्ये अनुभव सांगताना तो म्हणाला, "मी लेहमध्ये शॉपिंग करत असताना अचानक मला हे दुकान सापडलं. दुकान पाहताच क्षणी लक्षात आलं की ही तर 'धुरंधर'मधलीच हुबेहूब टपरी आहे. या दुकानाचं खरं नाव 'वॉसमा बट्ट' असं आहे.

या टपरीची एक रंजक वैशिष्ट्य सांगताना बायकरने सांगितले की, "इथे एकट्याने येण्यास अजिबात बंदी नाही, मात्र आत बसण्यासाठी तुम्हाला दोन चहा ऑर्डर करावे लागतात. एक चहा स्वतःसाठी आणि दुसरा या ऐतिहासिक जागेचा आणि वातावरणाचा मनसोक्त अनुभव घेण्यासाठी! लेहमध्ये येऊन जर तुम्ही इथला चहा घेतला नाही, तर चित्रपटाचा तो खराखुरा फीलच तुम्हाला मिळणार नाही".


दुकानाबाहेर लागलाय खास बोर्ड

चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच हे दुकान प्रत्यक्षातही अगदी तशाच हिरव्या रंगात रंगवलेले दिसते. विशेष म्हणजे, दुकानाच्या बाहेर 'धुरंधर पार्ट १ आणि पार्ट २ ची शूटिंग एसएच खान रेस्टॉरंटमध्ये झाली आहे" असा अधिकृत बोर्ड लावण्यात आला आहे. चित्रपटात आलम भाईंच्या मृत्यूनंतर रणवीर सिंह अत्यंत भावुक होऊन दोन चहा मागवतो, तो गाजलेला सीन याच टपरीवर शूट करण्यात आला होता. या दुकानाच्या आत त्या भावनिक दृश्याचे फोटोही लावण्यात आले आहेत.

खुद्द 'आलम भाईं'नी दिली प्रतिक्रिया

या व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सकडून प्रचंड प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. चित्रपटात आलम भाईंची भूमिका साकारणाऱ्या गौरव गेरा यानेही या व्हिडीओवर 'हार्ट' इमोजी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले, "एक चहा स्वतःसाठी आणि दुसरा आलम भाईंच्या आत्म्यासाठी". तर दुसऱ्याने विचारले, "लडाखमध्ये चहा गोड मिळतो की खारट?". आणखी एकाने लिहिले, "आता या माहितीनंतर या दुकानाबाहेर पर्यटकांची मोठी रांग लागणार हे नक्की!".

Web Title : 'धुरंधर' के आलम भाई की चाय की दुकान असली! स्थान मिला!

Web Summary : 'धुरंधर' में आलम भाई की हरी चाय की दुकान असली है! एक बाइकर ने लेह में इसका स्थान खोजा। 'वॉस्मा बट्ट' नामक दुकान में दो चाय ऑर्डर करने की आवश्यकता है: एक अपने लिए, एक अनुभव के लिए। अभिनेता गौरव गेरा ने दिल वाले इमोजी के साथ प्रतिक्रिया व्यक्त की।

Web Title : 'Dhurandhar's' Alam Bhai's tea stall is real! Location found!

Web Summary : The green tea stall from 'Dhurandhar,' featuring Alam Bhai, is real! A biker discovered its location in Leh. The shop, named 'Wossma Butt,' requires two tea orders: one for yourself, one for the experience. Actor Gaurav Gera reacted with a heart emoji.