रणबीर - कॅट मोरोक्कोत आले एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 10:59 IST2016-05-12T05:29:37+5:302016-05-12T10:59:37+5:30

 रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ यांच्या चाहत्यांसाठी खुप आनंदाची बातमी आहे. कालच आपण पाहिले की, ‘अनुराग बासुसोबत रणबीर एकटाच ...

Ranbir - Kat came together in Morocco! | रणबीर - कॅट मोरोक्कोत आले एकत्र!

रणबीर - कॅट मोरोक्कोत आले एकत्र!

 
णबीर कपूर आणि कॅटरीना कैफ यांच्या चाहत्यांसाठी खुप आनंदाची बातमी आहे. कालच आपण पाहिले की, ‘अनुराग बासुसोबत रणबीर एकटाच मोरोक्कोत जेवण करत होता. त्याच्यासोबत कॅटरिना कैफ नव्हती.

पण निर्मात्यांकडून कळाले की, ती लवकरच त्याला जॉईन करणार आहे. आणि ते खरंच झालं. नुकतेच ते ‘जग्गा जासूस’ साठी मोरोक्कोत शूटिंगसाठी एकत्र आले. चित्रपटाच्या दृष्टीकोनातून ते दोघे सध्या खूपच संघर्षात्मक परिस्थितीतून जात आहेत.

त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या अपलोड केलेले दिसत आहेत. या फोटोंमध्ये ती एका स्टायलिश लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर रणबीर कलरफुल टीशर्ट मध्ये दिसत आहे. तसेच स्पोर्टिंग चष्म्यात दिसत आहे. ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट रोमँटिक -कॉमेडी असून अनुराग बासु दिग्दर्शक आहेत.

ranbir and kat

ranbir

Web Title: Ranbir - Kat came together in Morocco!