Ranbir Kapoor : माझं वय झालंय..., रणबीर कपूरनं चित्रपटांबद्दल घेतला मोठा निर्णय, वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:16 AM2022-12-09T11:16:34+5:302022-12-09T11:18:30+5:30

Ranbir Kapoor : 40 वर्षाचा रणबीर कपूर इतक्यात स्वत:ला म्हातारा का समजू लागला आहे, हे कळायला मार्ग नाही. पण हो, यामुळे त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.

ranbir kapoor say he will not do romantic comedy he is getting older | Ranbir Kapoor : माझं वय झालंय..., रणबीर कपूरनं चित्रपटांबद्दल घेतला मोठा निर्णय, वाचून बसेल धक्का

Ranbir Kapoor : माझं वय झालंय..., रणबीर कपूरनं चित्रपटांबद्दल घेतला मोठा निर्णय, वाचून बसेल धक्का

googlenewsNext

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता. त्याच्या रोम-कॉम सिनेमांचा एक वेगळाचा चाहता वर्ग आहे. रणबीर लवकरच असाच एक रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा घेऊन येतोय. पण हा कदाचित रणबीरचा अखेरचा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा असणार आहे. होय, हे खरं आहे. आता यापुढे आपण या शैलीचे सिनेमे करणार नाही, असं रणबीरने स्पष्टचं सांगून टाकलं आहे. कारण काय तर, रणबीर म्हणे आता म्हातारा झालाये.

होय, हे आम्ही नाही तर रणबीरचं म्हणणं आहे. एकीकडे शाहरूख खान, सलमान खान,अक्षय कुमार  अद्यापही रोमॅन्टिक भूमिका करत असताना रणबीर स्वत:ला म्हातारा समजू लागला आहे. ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’च्या रेड कार्पेटवर रणबीर बोलला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

मी आता म्हातारा होतोय...
मला माहित नाही, पण कदाचित हा मी करत असलेल्या शेवटच्या रोमँटिक कॉमेडींपैकी एक असेल. कारण माझं वय वाढत आहे. मी म्हातारा होतोय, असं रणबीर यावेळी म्हणाला. 40 वर्षाचा रणबीर कपूर इतक्यात स्वत:ला म्हातारा का समजू लागला आहे, हे कळायला मार्ग नाही. पण हो, यामुळे त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. रणबीरने त्याच्या कारकिर्दीत अनेक रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2017 मध्ये आलेला जग्गा जासूस हा त्याचा शेवटचा असा सिनेमा होता.

रणबीर रणबीर येत्या काळात लव रंजनच्या एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. चित्रपट पुढील वर्षी 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.  


 
 ‘अ‍ॅनिमल’मध्ये साकारतोय ग्रे कॅरेक्टर
 ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातही रणबीर दिसणार आहे. साऊथचे दिग्गज दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी हे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात तो एक ग्रे शेड कॅरेक्टर साकारतोय. अलीकडे रणबीर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकला होता.  पत्नी आलिया भटबरोबरचा हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. नुकताच रणबीर बाबा झाला. आलियाने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया व रणबीरने आपल्या मुलीचं राहा असं नामकरण केलं आहे.

Web Title: ranbir kapoor say he will not do romantic comedy he is getting older

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.