‘सनी’ वर निर्माते नाराज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 10:41 IST2016-05-12T05:11:51+5:302016-05-12T10:41:51+5:30

सनी लिओनवर कोणी नाराज होऊ शकते का? पण, हो. असे कळते आहे की, सनीच्या ‘नो किसींग’ सीन्स मुळे चित्रपटाचे ...

Producer angry on Sunny? | ‘सनी’ वर निर्माते नाराज ?

‘सनी’ वर निर्माते नाराज ?

ी लिओनवर कोणी नाराज होऊ शकते का? पण, हो. असे कळते आहे की, सनीच्या ‘नो किसींग’ सीन्स मुळे चित्रपटाचे निर्माते मात्र नाराज होताना दिसत आहेत. मागील काही वर्षांपासून सनीने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट साकारून स्वत:चे नाव तयार केले आहे.

आॅनस्क्रीन ‘लिप लॉक’ सीन्स तिने साकारले असले तरी आता मात्र तिने असे सीन्स करायचे नाहीत म्हणून जाहीरच केले आहे. अभिनेत्री इंटीमेट सीन्स करण्यास शक्यतो नकार देत नाहीत. पण, जर स्क्रिप्टची डिमांड असेल तर त्या ते करायला तयार होतात.

पण ‘नो किसींग’ अशी घोषणा कोणी करत नाही. नुकतेच सनीचे रिलीज झालेले चित्रपट ‘एक पहेली लीला’, ‘कुछ कुछ लोचा हैं’,‘ मस्तीजादे’ आणि ‘वन नाईट स्टँण्ड’ यात तिने इंटीमेट सीन्स केले असले तरीही कुठल्याच सह कलाकारांना किस केलेला नाही.

आता निर्माते मात्र फारच गोंधळून गेले आहेत. सनीच्या या विचित्र घोषणेने निर्मात्यांची मात्र गोची झाली आहे.

Web Title: Producer angry on Sunny?