सलमानच्या 'भारत'मधून एक्झिट घेतल्यानंतर प्रियांका चोप्राने साईन केला 'हा' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 16:26 IST2018-07-30T16:23:49+5:302018-07-30T16:26:23+5:30

सलमान खानच्या भारत सिनेमातून माघार घेतल्यानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्राने नवा सिनेमा साईन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका आणि फरहान अख्तर यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत

Priyanka Chopra signed 'Ha' cinema after taking an exit from Salman's 'India' | सलमानच्या 'भारत'मधून एक्झिट घेतल्यानंतर प्रियांका चोप्राने साईन केला 'हा' सिनेमा

सलमानच्या 'भारत'मधून एक्झिट घेतल्यानंतर प्रियांका चोप्राने साईन केला 'हा' सिनेमा

ठळक मुद्देप्रियांकाच्या 'द स्काई इज पिंक'चे शूटिंग 8 ऑगस्टपासून मुंबईत सुरु होणार आहेया सिनेमाचे नाव 'द स्काई इज पिंक' असे आहे

सलमान खानच्या भारत सिनेमातून माघार घेतल्यानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्राने नवा सिनेमा साईन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका आणि फरहान अख्तर यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे नाव 'द स्काई इज पिंक' असे आहे. 8 ऑगस्ट पासून या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे.  


डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, प्रियांकाच्या 'द स्काई इज पिंक'चे शूटिंग 8 ऑगस्टपासून मुंबईत सुरु होणार आहे. रिपोर्टमध्ये प्रियांका सलमानच्या सिनेमाची शूटिंग ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु करणार होती असेदेखील नमूद करण्यात आले होते. मात्र आता प्रियांका फक्त एकाच सिनेमाचे शूटिंग करणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार प्रियांकाने हा सिनेमा लग्नाच्या कारणांमुळे सोडल्याचे समजते. प्रियांका व निक येत्या सप्टेंबर महिन्यात लग्न करू शकतात, असे कळतेय. येत्या 16 सप्टेंबरला निक 26 वर्षांचा होतोय. याच दिवशी या कपलचा डबल सेलिब्रेशनचा प्लान असल्याचे कळतेय. अद्याप प्रियांका वा निक या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी सुरू झालीयं, इतपत चर्चा आहे. आता खरे काय नि खोटे काय, हे प्रियांका व निक या दोघांनाचं ठाऊक. पण दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजतेयं, इतके मात्र नक्की. गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निकशी प्रियांकाचे नाव जोडले जात आहे. प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. भारतातील मुक्काम संपवून निक व प्रियांका अमेरिकेत रवाना झाले आणि येथून पुढे ब्राझिलला पोहोचले. ब्राझिलमध्ये निकचे लाईव्ह कॉन्सर्ट होते. येथे प्रियांकाही त्याच्यासोबत होती.

Web Title: Priyanka Chopra signed 'Ha' cinema after taking an exit from Salman's 'India'