OMG : विरोध करूनही ‘त्याने’ विद्या बालनच्या कमरेत टाकला हात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 02:19 PM2017-03-15T14:19:28+5:302017-03-15T19:49:28+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी ‘बेगम जान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती सध्या ...

OMG: Despite opposition, 'he put' in the room of Vidya Balan! | OMG : विरोध करूनही ‘त्याने’ विद्या बालनच्या कमरेत टाकला हात!

OMG : विरोध करूनही ‘त्याने’ विद्या बालनच्या कमरेत टाकला हात!

googlenewsNext
लिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी ‘बेगम जान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती सध्या विविध ठिकाणी जात असून, विद्याचा साडीतील लूक जबरदस्त पसंत केला जात आहे; मात्र जेव्हा ती याच लूकमध्ये कोलकाता येथे प्रमोशनसाठी गेली तेव्हा कोलकात्याच्या ‘दमदम’ विमानतळावर तिला अत्यंत वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. एका पुरुष चाहत्याने तिच्याशी सेल्फी काढण्यासाठी चक्क तिच्या कमरेत हात घातला. विद्याने विरोध केला असतानाही हा चाहता जुमानत नसल्याने या सर्व प्रकारामुळे विद्या चांगलीच संतापली होती. 



त्याचे झाले असे की, विद्या निर्माते महेश भट आणि दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जीही यांच्यासोबत कोलकात्याच्या विमानतळावर पोहोचली. त्यावेळी एक पुरुष विद्याच्या दिशेने धावत आला. त्याला विद्याबरोबर सेल्फी काढायचा होता; मात्र त्याने कोणालाही न विचारता फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने विद्यालाही काही सुचले नाही; मात्र विद्याचा खरा संताप तेव्हा झाला जेव्हा त्याने तिला स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्याने थेट विद्याच्या कमरेत हात टाकत तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. विद्याला या प्रकार खूपच संतापजनक वाटला. तिने त्याला बजावत ‘तू असं करू नकोस’ असे सांगितले. परंतु त्याने विद्याचे काही एक न ऐकता आपला उद्योग सुरूच ठेवला. 

अखेर हा संपूर्ण विद्याच्या मॅनेजर आणि टीमच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच त्या चाहत्याची समजूत काढत त्याला विद्यापासून बाजूला नेले. याचवेळी माध्यमांचे काही प्रतिनिधीही विद्याची छबी टिपण्यासाठी याठिकाणी उपस्थित असल्याने विद्याने त्याना पोज देण्यास सुरुवात केली. परंतु या चाहत्याने पुन्हा एकदा विद्याच्या दिशेने धाव घेत तिसºयांदा तिच्या कमरेत हात घातला. त्यानंतर मात्र विद्याचा चांगलाच पारा चढला. विद्याने त्याला असे काही सुनावले की, त्या चाहत्याला तिची माफी मांगावी लागली. मात्र विद्या सोबतच्या सेल्फीचे भूत डोक्यावर चढलेल्या या चाहत्याने पुन्हा तिच्याशी सेल्फी घेण्याचा आग्रह धरला. 



यावेळेस मात्र विद्याने त्याला खडेबोल सुनावताना आधी वर्तणूक सुधार असे म्हणत स्पष्ट शब्दात फोटो काढण्यास नकार दिला. ‘स्पॉटबॉय ई’ ला दिलेल्या मुलाखतीत विद्याने ही माहिती दिली. जेव्हा अनोळखी व्यक्ती तुमच्या शरीरावर हात ठेवते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता. तो तुमच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप असतो. मी पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नाही, असे संतापजनक उद्गार विद्याने यावेळी बोलून दाखविले. 

Web Title: OMG: Despite opposition, 'he put' in the room of Vidya Balan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.