ऑगस्टमध्ये रुपेरी पडद्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सिद्धार्थ मल्होत्रा देणार एकमेकांना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 13:59 IST2017-07-12T07:56:19+5:302017-07-12T13:59:31+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'बाबुमोशाय बंदुकबाज' आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘ए जेंटलमॅन’ चित्रपट ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार आहेत. ...

Nawazuddin Siddiqui and Sidharth Malhotra fight against rupee screen in August | ऑगस्टमध्ये रुपेरी पडद्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सिद्धार्थ मल्होत्रा देणार एकमेकांना टक्कर

ऑगस्टमध्ये रुपेरी पडद्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सिद्धार्थ मल्होत्रा देणार एकमेकांना टक्कर

ाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'बाबुमोशाय बंदुकबाज' आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘ए जेंटलमॅन’ चित्रपट ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार आहेत. दोन्ही चित्रपट 25 ऑगस्टला रिलीज होणार आहेत. बाबुमोशाय बंदुकबाज' चित्रपट कुशन नंदी दिग्दर्शित आहेत यात नवाज एका शूटरच्या रोलमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटाची कथा नवाजचे मित्र, शत्रू, त्याचे प्रेम आणि त्याचा सूड याभोवती फिरणारी आहे. हा एक एक्शन ड्रामा चित्रपट आहे. यात नवाजसोबत ताहिर भसीन, दिव्या दत्ता आणि बंगाली अभिनेत्री बिदीता बेग मुख्य भूमिकेत आहे. 

'ए जेंटलमॅन' हा एक एक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. राज निदीमोरू आणि कृष्णा डिके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात सिद्धार्थसोबत जॅकलिन ही झळकणार आहे. सिद्धार्थ आणि जॅकलिन पहिल्यांदाच एकत्र काम करित आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. 'ए जेंटलमॅन' सिद्धार्थचा डबल रोल आहे. गौरव आणि ऋषी अशा दोन्ही भूमिका तो करतोय. गौरव अतिशय शालिन मुलगा आहे. गौरवच्या आयुष्यात काव्या नावाच्या मुलींची एंट्री होती. जिच्यासोबत गौरवला लग्न करायचे असते. मात्र काव्याला गौरव फारच सेफ लाईफ जगणारा मुलगा वाटतो. काव्याला आयुष्यात रिस्क घेणारा मुलगा हवा असतो आणि याच दरम्यान तिला ऋषी भेटतो. मग चित्रपटात एक्शन आणि रोमांसला सुरुवात होते. काव्याची भूमिका जॅकलिनने साकारली आहे. हे दोन्ही चित्रपट येत्या 25 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देण्यास सज्ज आहेत.

Web Title: Nawazuddin Siddiqui and Sidharth Malhotra fight against rupee screen in August